Gazal


 वृत्त -मंजूघोषा

लगावली-

गालगागा गालगागा गालगागा


भाकिताला शोधणारे पार झाले

वर्तमानी  मोडणारे फार झाले


योजनांना आखणारे खूप झाले

कामगारा ठेचणारे वार झाले


शोषितांच्या वेदनांचे घाव ओले

दु:ख सारे पाहणारे गार झाले


गारवा हा शांततेचा आज आला

 शाप वाटे टोचणारे सार झाले


वल्गनांचा पूर येथे दाट आहे

सत्य सारे खंगणारे ठार झाले


अर्चना मुरूगकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरे ब्रह्मकमळ

देवीची नऊ रूपे

जाणता राजा