गझल - वृत्त-कालगंगा (गझल)




 लगावली- गालगागा गालगागा गालगागा गालगा

गझल - वृत्त-कालगंगा

आसमंती गुंजणारा एक नारा पाहिजे

कार्यकर्ते जोडणारा एक तारा पाहिजे


वाळवंटी रापलेले आश्रयाला धावले

अंतरीच्या दानतीचा नेक थारा पाहिजे


पोळलेले नाडलेले सोसण्याने तापले

सांत्वनाला धावणाऱ्या थंड गारा पाहिजे


रक्त सारे गोठलेले अंध सारेच धावती

तापताना पांगणारा आत पारा पाहिजे


जीवनाला तोंडदेण्या कैक वाटा चालती

सन्मतीने योग्य रस्ते ताडणारा पाहिजे. 


अर्चना मुरूगकर






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरे ब्रह्मकमळ

देवीची नऊ रूपे

जाणता राजा