प्रेम आगळे

 झुलती हिंदोळे मनमोदाचे


सुंदर वेली गंधित पुष्पे

कृष्ण मनोहर त्यात सावळे

सवे राधिका बिलगुनी दिसते

विशुद्ध प्रेम नाते आगळे


मिलन होता दो जीवांचे

एक प्राण जे बनुनी जाती

अधीर, अपूर्णता प्रतिक्षेतली

संपून सारे एकच बनती


नंदनंद हा प्रेम मुरारी

मनामनात गोपींच्या ठसला

मदन मोहन हृदय देवुनी

राधिकेच्या हृदयी वसला


चिरतरुण हे प्रेम दोघांचे

आदर्श साऱ्या युगायुगांचे

उत्सव सृष्टीचा वसंतातला

झुलती हिंदोळे मनमोदाचे


अर्चना मुरूगकर 🌹🥀🦚




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरे ब्रह्मकमळ

देवीची नऊ रूपे

जाणता राजा