गझल

 





अननज्वाला

८+८+८

माहेराची कणखर छाया असते राखी

रेशमधागे कोमल लेवत सजते राखी


भाऊराया रक्षणकर्ता बहिणीपाठी

चिंता सरुनी हृदयामध्ये ठसते राखी


समृद्धीचे दान मागते भावासाठी

नात्यांमधले प्रेम पाहुनी हसते राखी


कृष्ण सुभद्रा कर्मवतीचा अम्हा वारसा

दोन घरांचे हीत जाणुनी जपते राखी


वर्धन होते दृढ प्रेमाचे जगतामध्ये

आनंदाने मनात येथे वसते राखी


अर्चना मुरूगकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरे ब्रह्मकमळ

देवीची नऊ रूपे

जाणता राजा