रसग्रहण
*_🌈गझल नक्षत्र 🌈_* *गझल क्रमांक ०१* *मनाचा मनाला जिथे ठाव नाही* *नकाशात माझ्या तुझे गाव नाही* गझलकार म्हणतात की, आपली मनेच जुळत नाहीत तेव्हा मी तुझ्याबद्दल विचारच करणार नाही. माझ्या नकाशात तुझे गावच नाही. *नको मंथनाचे तुझे चंद्र मजला* *तुझ्या अमृताची मला हाव नाही* समुद्रमंथनातून चौदा रत्ने जी मूल्यवान रत्ने निघाली त्यांच्यात चंद्रमा ही आहे. गझलकार म्हणतात की असे खूप मूल्यवान असलेले, मंथनातून निघालेले पण तुझे असलेले चंद्रही नको आहेत. अमृत प्राशनाने देव अमर झाले होते. पृथ्वीवर त्याची ज्याला त्याला हाव आहे. पण नाकारलेल्या नात्यातून येणारे काहीही नको आहे. असे येथे म्हटले आहे. *जगा सांगते वेस फोडून टाहो* *इथे चोर सारे कुणी साव नाही* वेस, गावाचे प्रवेशद्वार. गावात प्रवेश करण्यापूर्वी ती स्वागत करत असते. पण वेस आता गावात येणाराला सावध करत आहे. इथे राहणारे चोर आहेत. तुम्हाला लुबाडतील.कोणीही सावंत उरले नाही. आश्रयाला येऊ नका. *नसे गंध याला फुलांचा जराही* *मला वाटते हा तिचा घाव नाही* जरी प्रिय व्यक्तीने दिलेले घाव वेदनादायी असतात त्यासोबत काही हळ...