रसग्रहण
*गझल क्रमांक - १*
_*पादाकुलक*_
*आठवणींचा झोका तुटला*
*स्वप्नांचाही मेळा उठला*
आठवणी या प्रेयसीच्या संबंधित, भूतकाळातील, बालपणाशी संबंधित
अशा असतात. जेव्हा हा अधांतरी असणारा, आनंद दुःखाच्या हिंदोळ्यावरचा झोका तुटला तर
त्याच्याशी संबंधित स्वप्नही तुटतात. धुळीला मिळतात.
*पैसे देता नाते सुदृढ*
*नकार देता म्हणती कुठला*
बऱ्याच वेळा नातीगोती देण्याघेण्यावर अवलंबून असतात. गुळाभोवती मुंगळे. अशा माणसाची त्याची श्रीमंती
पाहून हांजी हांजी करतात. संबंध आशेने टिकवून ठेवतात.
याउलट जो पैसे देऊ शकत नाही त्याला कोणी विचारत नाही.
*वडील मरता हिस्से वाटप*
*भाऊ-भाऊ भरती खटला*
एक घर, कुटुंब जे होते, सगळ्यांचे भाऊ म्हणून प्रेम ते वडील गेल्यानंतर
स्वार्थामुळे आणि मला कमी मिळेल या शंकेने वैऱ्याप्रमाणे नाते होते.
*स्वप्ने मुलांचे पूर्ण कराया*
*बाप उपाशी रोजच झटला*
मुलांचे शिक्षण, अनेक सुखसोयी, आरामदायी जीवन यासाठी वडील
त्याग करत असतात. प्रसंगी उपाशी राहून स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाठिंबा
देत असतो.
*लग्न मुलीचे यंदा व्हावे*
*बेत बळीचा चुकून फसला*
शेतकऱ्याची अवस्था नेहमी त्रस्त. कधी ओला, कधी कोरडा दुष्काळ. चार पैसे वर्षाच्या काठी येतील आणि
लेकीचा लग्न करू हे स्वप्नही अपूर्ण
राहते.
*आयुष्याच्या संध्याकाळी*
*हात कुणाचा मधेच सुटला*
म्हातारपण खचवणारे. मानसिक व शारीरिक बाबतीत विकल करणारे. यात आप्त, स्वकीय यांचा मृत्यू झाला
तर आणखी दुःख होते.
*मनास हिरवे बघण्यासाठी*
*साठीमध्ये आबा नटला*
काहीवेळा वयाला न शोभणाऱ्या गोष्टी
माणूस उतार वयात करतो आणि हसू करून घेतो. गेलेले तारूण्य परत येत नाही .
*जुनाट वाटा चालत असता*
*विश्वास कसा त्यांनी लुटला*
ज्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला
म्हणून त्याच्या मागे गेलो त्यांनी विश्वास घात केला की वाईट वाटते.
*पंचशिलेने जीवन नटता*
*बुद्धमार्ग मग खरेच पटला*
जीवनामध्ये पंचशील तत्वाचा अवलंब
केल्यानंतर बुद्धांनी दाखवलेल्या धर्माची खरी प्रचीती आली. जीवन शांतीने व्यतीत झाले.
*रमेश सरकाटे ,भुसावल*
अर्चना मुरूगकर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा