रसग्रहण ०६/०५/२२

 🤗 _*हझल क्रमांक - २*_ 🤗


*चहूकडे चांडाळ-चौकड्या*

 *कशास घालू मधे तंगड्या* 


चांडाळचौकडी ही नको त्या गप्पा करण्यासाठी जमलेली असते. त्यांच्या या भानगडींची फलनिष्पत्ती ही निरर्थक असणार आहे. अजून हा गुंता वाढविण्यासाठी मी कशाला सामील होऊ? 

रिकाम्या चांडाळचौकड्यांमधील असेच लोक सर्वत्र दिसत आहेत. मी 

तंंगड्या घालणे, विनाकारण सामील होणे तमाशा (😁)घडवून आणण्या सारखेच आहे. 


*कुठला कंपू, कुठला अड्डा!* 

*उगाच उठवू नका वावड्या* 


दुसऱ्यांकडे बघून विनाकारण मत बनवणे घाई करण्यासारखे आहे. फक्त ही तुमची भीती असू शकते! 

हे अस्तित्वातच नाही ना! 


*कशास देता कान भिंतिला* 

*खिडक्या माझ्या सताड उघड्या* 

माझ्याबद्द्ल बातम्या काढायचा प्रयत्न करू नका. मी सगळे माझे जीवन उघडे, सगळ्याला कळेल असे ठेवले आहे. एवढेपण कष्ट घेऊ नका हो! 


*अख्खे जग हे फिदा तुझ्यावर!* 

*किती कल्पना तुझ्या भाबड्या* 

माणसाला आपण लोकांना फार आवडतो, ते मागे लागले आहेत, असे वाटते. 

हे! हे! किती भोळेपणा आहे हा! कोणी तुझ्या मागे लागले नाही. 



*टिपूस नाही डोळ्यांमध्ये* 

*गप्पा सा-या इथे कोरड्या* 


कित्ती आव आणता हो तुम्हाला दु:ख झाले आहे याचा. डोळ्यात तर एक थेंबही नाही. 

बऱ्याच वेळा दु:ख हे दाखवण्यापुरते असते. 

शिष्टाचार पण! 


*पुन्हा बालपण आणू परतुन* 

*घालू फुगड्या, कुणी लंगड्या* 

बालपण अगदी निरागस. चला जाऊ या परत. खेळ खेळूया. 


*खूपच दिसती सुंदर आता* 

*तेव्हा होत्या किती शेंबड्या* 

ई ई. 

लहानपणी अगदी साध्या भोळ्या मुली

मोठ्या झाल्यानंतर अगदी फॅशनेबल, काॅशस बनतात. 

एखाद्या लहानपणी च्या मित्राला हे पाहून गंमत करावीशी वाटते. 


*कुंकू गेले, उरल्या टिकल्या* 

*कुठे पाटल्या, कुठे बांगड्या?* 


नव्या फॅशनच्या जमान्यात जुने काहीच राहिले नाही. काय या नव्या पोरी? 


*नजर उचलुनी पहा वर जरा* 

*माना झाल्या किती वाकड्या* 


अगदी मिश्किल दृश्य. सुंदर मुलगी, स्त्री आपल्याच तालात असते. पण तिला कल्पनाच नसते किती जण पुन्हा पुन्हा पहात असतात. 


हसू निर्माण करणाऱ्या अनेक क्षणांना हझलकरांनी पकडले आहे. बांधले आहे. 

 _*@ कालिदास चवडेकर @*_


अर्चना मुरूगकर


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरे ब्रह्मकमळ

देवीची नऊ रूपे

जाणता राजा