अलक
*२५/५/२२*
*अलक लेखन*
*विषय: वाढदिवस*
घरात वाढदिवस म्हणजे धामधूम असायची. ताईचा वाढदिवस असला की तिचे अगदी कौतुक असायचे. भाऊच्या वाढदिसालाही मित्र, मैत्रिणी,
ग्रीटींग्स, हट्ट पुरवणे, सारे व्हायचे
बाबा गेले, पुजेसाठी फोटो बनवताना, त्यावर जन्म, मृत्यूच्या तारखा टाकल्या जात होत्या. अचानक लक्षात आले की सगळ्यांचे सारे करताना त्यांचा वाढदिवस मात्र कधी साजरा झालाच नव्हता.
सौ. अर्चना मुरूगकर
त. दा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा