गझल रसग्रहण (निखारा)
निखारा """"'""""" *शांतपणे मी अवघड जगणे जगत राहिलो* *सुखस्वप्नांच्या भासावरती झुलत राहिलो* आजचे जगणे अवघड आहे तरी मी ते तक्रार न करता जगत आहे. त्या दु:खात असूनही सुखाचे भास मला होत राहिले. येणाऱ्या सुखाच्या आशेवर मी जगत राहिलो. *अवती भवती जमले सारे सगेसोयरे* *स्वार्थ साधून निघून गेले कुढत राहिलो* सगेसोयरे फायद्यासाठी जवळ आले होते. त्यांचे काम झाले की निघून गेले आणि मी मात्र त्यांच्या आठवणीने आणि असा संधीसाधू पणा पाहून मनातच पुन्हा पुन्हा दु:ख करीत राहिलो. *किती उन्हाळे जाळत गेले माहित नाही* *धोकादायक वळणावरती वळत राहिलो* नेहमी येणाऱ्या वंचनांमुळे गझलकाराचे मन दु:खी आहे. संकटामुळे होरपळले आहे. तरीही धोका पत्करुन, आव्हाने स्विकारुन जीवनात पुढे जाणे चालू आहे. *जिकडे तिकडे रानभुलीच्या वाटा होत्या* *कुठे निवारा सापडतो का बघत राहिलो* जो मार्ग चोखाळावा तो भूल घालणारा फसवा निघत आहे. यामुळे जिवाला कोणताच दिलासा आधार राहिलेला नाही. अशाही स्थितीत जिद्द न सोडता निवारा, आपल्या हक्काची विसाव्या ची जागा माणूस शोधत असतो. *किती लांबचा प्रवास झाला क...