पोस्ट्स

ऑगस्ट, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नागपंचमी

इमेज
 नागपंचमी खरोखरच विहंगम असे श्रावणाचे चित्र!   हा सणांचा महिना! श्रावणी सोमवार, शुक्रवार यातून श्रावणाची गंमत सुरू होते.   बेल, आघाडा, केणा,दुर्वा, फुले गोळा करताना बारकाईने हिरवी सृष्टी बघायला मिळते. पूजा, मंगलमय आरती याने भारावून गेल्यासारखे वाटते.       नागपंचमी हा एक श्रावणातला सुंदर सण! या दिवशी नागाची पूजा करण्यासाठी वारुळाला म्हणजे नागोबाच्या मंदिरात बायका जातात. बांगड्या, नेलपेंट, रिबिनी,नवे कपडे याची गंमत असते.हातावर मेंदी लावली जाते. हिरवागार निसर्ग, लालबुंद रंगलेली मेंदी हा संगम आनंददायी वाटतो. एक बदल! यातून सौंदर्यदृष्टी विकसित होते. ज्वारीच्या  लाह्यांचा प्रसाद असतो. फोडणीच्या लाह्या, दही मेतकूट घातलेल्या लाह्या असे पदार्थ खायला मिळतात. ज्वारी हे कोंडायुक्त भरडधान्य त्याच्या भाजून बनवलेल्या लाह्या पचायला हलक्या असतात.   पंचमीदिवशी उकडीचे पदार्थ करतात. मुटके भात, पुरणाचे दिंड,ओल्या शेवयांची खीर हे या ऋतूमानात पचणारे ,हलके असे अन्न! वडिलांचे,भावांचे डोळे धुवून औक्षण केले जाते. डोळ्यांचे आरोग्य जपणे महत्वाचे आहे.  नागपंचमीच्या कथा या शेतीजीवनाशी निगडित आहेत.नाग हा शेतकऱ्यांच्

धबधब्यावरील अपघाताची कारणे व उपाय*

इमेज
  धबधब्यावरील अपघाताची कारणे व उपाय * धबधब्यावरील अपघातांच्या घटना या मनाचा थरकाप उडवणाऱ्या असतात.टी.व्ही वर नातेवाईकांचा दाखवला जाणारा विलाप सहवेदना निर्माण अरणारा असतो. का? का? का गेले असतील हे? हा एक क्षण टळला असता तर? कशाने तरी ती छोटी मुले वाचली असती तर? हे पुन्हा , पुन्हा मनात येते. अनेक ठिकाणी या घटना नेहमीच होत असतात.रात्री उशिरापर्यंत, पावसापाण्यात जखमींना किंवा पार्थिव शरीरांना शोधणाऱ्यांचीच काळजी वाटते. एवढा निसर्ग त्यावेळी अनियंत्रित झालेला असतो.लोणावळ्यातील घटना, मागच्या वर्षी हरिश्चंद्र गडावरील पावसात अडकलेली मुले,त्यात गेलेला एक छोटा मुलगा.गड चढताना होणारे अपघात ,हे सगळे आठवत असते.मध्यंतरी एक रीलस्टार मुलगी गेली.  या सगळ्यामागे वेगवेगळ्या मानसिकता आहेत. तरी आनंद मिळवणे हा एक समान हेतू आहे. ऋतूबदल हा मनाला सुखावणारा असतो. निसर्गाचे विलोभनीय  दृश्यही सगळ्यांनाच भावते. माणूस रोजचे रहाटगाडगे ओढत असताना अनेक आनंदांना मुकतो. अचानक कुठे तरी हे वेगळेपण पाहून उत्सुकता, आवड वाढत जाते. त्यात तो गुंतत जातो.  आनंदाच्या कल्पना आता बदलत आहेत. तरूण - तरूणी बाहेर शिक्षणासाठी राहतात, त्या