पोस्ट्स

मावळ सौंदर्य आणि सोनकुसूम पुष्पौत्सव' :

इमेज
'मावळ सौंदर्य आणि सोनकुसूम  पुष्पौत्सव'    :                 नोकरीच्या निमित्ताने मावळात रहायला आलो ,आता मात्र अगदी मावळाच्या आम् ही प्रेमातच  पडलो. इथे उन्हाळ्यात अतिशय थंडगार हवा असते. पावसाळ्यात तर दृष्टीचे पारणे फेडणारे निसर्ग सौंदर्य सर्वत्र दिसून येते. हिरवेगार गवतांचे गालीचे, डोंगरावर उतरलेले ढग,सतत पडणारा पाऊस,खळाळणारे झरे ,धबधबे मावळात असतात.दरी, डोंगर,नाले सगळे काही पावसाने कंच भिजलेले.छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान ज्यांच्या उरात भरलेला आहे असे सर्व आधुनिक मावळे गड-किल्ले सर करत असतात, दऱ्या-खोऱ्यांमधून फिरत असतात. पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी लोणावळा-खंडाळा, भाजे लेणी, लोहगड, खांडी धबधबा, कोंडेश्वर याठिकाणी पुण्या-मुंबईच्या पर्यटकांची अगदी गर्दीच असते. रस्ते वाहनांनी फुललेले असतात.           हिवाळ्यातही अतिशय प्रसन्न भासतो हा मावळ!  हिरवेगार डोंगर ,पांढरा स्वच्छ प्रकाश,निळेशार विस्तीर्ण आभाळ!                           मावळ म्हणजे नक्की काय ह्याबद्दल स.आ.जोगळेकर ह्यांच्या सह्याद्री' ह्या पुस्तकांत सदर्भ आहे की नदी डोंगरातून उतरली की जो विस्तीर्ण प्रांत नद

मिसाईल मॅनची अखंड उर्जा

इमेज
   मिसाईल मॅनची अखंड उर्जा कुणी जीवन उपभोगी अतिरिक्त कुणी साठवी  पैसा मुलांसाठी फक्त| कुणी मढवी जीवन अहंकार, पदांनी दाता शिक्षक हा गेला रिक्त हस्तांनी|| भाव सर्वांमनी चिरंतन आदराचा  प्रयत्न सदैव विद्यार्थी बनण्याचा||  अग्निपंख रोहित जन्माचा दिवस हा असे वाचनप्रेरणेचा|| विद्यार्थीप्रेमी अन् पुस्तकप्रेमी भारतरत्नाचे स्वप्न सदैव भारताच्या प्रगतीचे|| शास्त्रज्ञ,राष्ट्रपती , मिसाईल मॅनचे लेखकरूपी विचारवाहकाचे,दर्शन अखंड उर्जेचे||

लॉकडाउन आणि मी

इमेज
       लॉकडाउन आणि मी   अचानक लॉकडाउन लागले आणि खरेच वाटेना की आपण काही काम न करता घरातच आहोत. करोना विषयीच्या बातम्या , भारताचा कितवा नंबर , कोणत्या सेलिब्रेटीला , नेत्याला झाला , सगळे पुन्हा पुन्हा टीव्हीवर पहायचे . घरातला बदल म्हणजे कामवाली नाही . काय काय गमतीशीर व्हिडिओज आणि मीम्स यावर येत होते . आणि चॅलेंजेस ! नथीच्या फोटोंचे , लग्नाच्या फोटोंचे , साडीचे , वेस्टर्न कॉस्च्युम्सचे .        यानंतर झूम मिटींगस् . व्हिडिओ कॉल्स आणि फॅमिली मिटींगस् . सगळेच ऑनलाइन . जो तो ऑनलाइन . शाळा कॉलेज ऑनलाइन . त्याच्याही गमती - जमती , नाविन्य ! जुन्या लोकांचे अडखळत शिकणे तर नव्या मुलांचे लिलया वावरणे चालू झाले . वर्क फ्रॉम होम आणि त्यातील गमतीजमती आणि त्रास चालूच होते . काही बायकांना नवरा व त्याचा मोबाईल घरीच असल्याने , नवऱ्याने कष्टाने लपवलेल्या गुप्त कहाण्या सहजगत्या समजल्या . अशीच कोण्या बायकोबद्दलची माहिती मिळाल्यानंतर तिच्या नवऱ्याने तिच्यावर खूनी हल्ला केला . अशीही बातमी वाचण्यातआली . लॉकडाउन मुळ