पोस्ट्स

सण एक, रूप अनेक

इमेज
  येतो सण, जातो सण,  साजरे करण्यात वेगळेपण| राजकारणी देती आश्वासन,   उणे-दुणे ,गरळातून शरसंधान|  कुणा संधी सोन्याची पैश्यातून पैसे मिळवण्याची| जाहिराती ,वातावरण आभासाचे,  बाजार पेठा तुडुंब भरवण्याचे| कुणी भरवती इव्हेंट मोठे,  गळाला लावण्या  सारे छोटे| कोणी जपी रित-भात नी नाती,  मित्र, नातेवाईक एकत्र येती| कुणी आई बाप करती मुलांची हौस,  खंड नसे त्यांच्या कष्टांस| श्रीमंतांसाठी संधी असे मिरवण्याची,  कपडे,दागिने ,लक्ष्मीच्या प्रदर्शनाची| कुणा क्षण असती हर्षोल्हासाचे,  तापत्रयीतून बाहेर डोकावण्याचे| कुणा असे जगण्याची भ्रांत,  हाता-तोंडाची गाठ पडो हीच खरी शर्यत| सर्वांची देवाकडे एकच आस,  सुखी घडो जीवन प्रवास| सण आहेत वारसा संस्कृतीचा,  निसर्ग आणि मानवाच्या समन्वयाचा| सण आहेत जागर दैवी शक्तींचा ,  पडू देवू नका विसर मानव्य शक्तींचा| 🙏❤

उपवास म्हणजे नेमकं काय ???

इमेज
                                                         ' उप-वास 'म्हणजे मन व शरीर शुद्धीचा यज्ञ आहे.      ' उप 'म्हणजे जवळ, आणि 'वास' म्हणजे वास्तव्य. याचा अर्थ देवासाठी केलेले उपवास म्हणजे परमेश्वराच्या जवळ राहणे.     भारतीय आणि उपवास यांचे नाते आपण चांगलेच जाणून आहोत ,त्यातही इतर गोष्टींप्रमाणेच महाराष्ट्र यातही आघाडीवर आहे.        आयुर्वेदानुसार उपवासामुळे आपला जठराग्नी पुन्हा प्रज्वलित होतो. ह्या जठराग्नीतील वाढ आपल्या शरीरातील टाकाऊ विषकण नष्ट करते. हे टाकाऊ विषकण शरीराच्या बाहेर घालविले जातात, त्यामुळे सुस्ती आणि मंदपणा कमी होतो. शरीरातील पेशीपेशीत नवचैतन्य जागृत होते. त्यामुळेच, उपवास हा शरीरशुद्धीसाठी प्रभावी उपचार ठरलेला आहे. जेव्हा शरीर शुद्ध होते, तेव्हा मन सुद्धा अधिक शांत आणि स्थिर होते, कारण शरीर आणि मनाचा गहिरा संबंध आहे.       बहुदा, आपल्यापैकी बरेच लोक भूक लागण्याची वाटच बघत नाही. भूक लागणे म्हणजे आपले शरीर अन्न पचविण्यासाठी आता सज्ज आहे हे दर्शविण्याचा त्याचा मार्ग आहे. भूक लागण्यापूर्वीच खाल्ल्यामुळे आपली पाचनप्रणाली अजून दुबळी होते, परिणामी

गणेश चारोळ्या-भाग-3

इमेज
         नवीनच बनलेल्या ब्लॉग लेखन व्हाट्सअॅप ग्रुपवर सोनाली देवळेकर मॅडमशी ओळख झाली. Morning moraya या मथळ्याखाली रोज गणेशाचे नवे चित्र येत असे. त्यावर रोज नवी चारोळी  लिहून त्या पाठवत असत. आम्हालाही लिहिण्याची इच्छा निर्माण झाली. त्यांनी ही चित्रे ग्रूपवर पाठवण्यास सुरूवात केली. हा अद्भुत योग त्या ं च्यामुळे जुळून आला.अगदी 10-15 चारोळ्या सकाळीच 9 ते 10 वाजेपर्यंत वाचायला मिळतात.       प्रत्येकाला बाप्पा आपल्या दृष्टी प्रमाणेच दिसतो. लिखाणाची ढबही वेगवेगळी. भाव तोच, भक्ती तिच,शब्दांकन मात्र वेगवेगळे. ना कसली स्पर्धा, ना कोणतेबंधन! सकाळीच शब्दसुमनांनी बाप्पाची पूजा. नवलेखकांना विद्याधीश गणेशाचा जणू आशीर्वादच.       चित्र कवितांचा जणू छंदच जडला. सगळ्यात हत्वाचे म्हणजे ठाण्यातील कलाकार श्री. दिलीप वैती सर ही चित्रे पाठवतात. त्यांच्या व्यस्त दिनचर्येत नवी जबाबदारीच.या सगळया  त्या दिवशीच्या कवितांचे ते पी. डी. एफ. ही बनवूनही पाठवतात.बाप्पाचे नवे चित्र पाहून आम्ही अगदी स्तिमित होऊन जातो.यासाठी त्यांचे व विश्वविनायक  ग्रूपचे मानावे तेवढे आभार कमीच.सर्वांच्या कवितांचे मनापासून कौतुकही करतात

गणेश चारोळया -भाग-2

इमेज
      नवीनच बनलेल्या ब्लॉग लेखन व्हाट्सएप ग्रुपवर सोनाली देवळेकर मॅडमशी ओळख झाली. Morning moraya या मथळ्याखाली रोज गणेशाचे नवे चित्र येत असे. त्यावर रोज नवी चारोळी  लिहून त्या पाठवत असत. आम्हालाही लिहिण्याची इच्छा निर्माण झाली. त्यांनी ही चित्रे ग्रूपवर पाठवण्यास सुरूवात केली. हा अद्भुत योग त्या ं च्यामुळे जुळून आला.अगदी 10-15 चारोळ्या सकाळीच 9 ते 10 वाजेपर्यंत वाचायला मिळतात.       प्रत्येकाला बाप्पा आपल्या दृष्टी प्रमाणेच दिसतो. लिखाणाची ढबही वेगवेगळी. भाव तोच, भक्ती तिच,       शब्दांकन मात्र वेगवेगळे. ना कसली स्पर्धा, ना कोणतेबंधन! सकाळीच शब्दसुमनांनी बाप्पाची पूजा. नवलेखकांना विद्याधीश गणेशाचा जणू आशीर्वादच.       चित्र कवितांचा जणू छंदच जडला. सगळ्यात महत्वाचे म्हणजे ठाण्यातील कलाकार श्री. दिलीप वैती सर ही चित्रे पाठवतात. त्यांच्या व्यस्त दिनचर्येत नवी जबाबदारीच.या सगळया  त्या दिवशीच्या कवितांचे ते पी. डी. एफ. ही बनवूनही पाठवतात.बाप्पाचे नवे चित्र पाहून आम्ही अगदी स्तिमित होऊन जातो.यासाठी त्यांचे व विश्वविनायक  ग्रूपचे मानावे तेवढे आभार कमीच.सर्वांच्या कवितांचे मनापासून कौतुकही कर

गणेश चारोळ्या-भाग-1

इमेज
गणेश चारोळ्या         नवीनच बनलेल्या ' ब्लॉग लेखन 'व्हाट्सएप ग्रुपवर सोनाली देवळेकर मॅडमशी ओळख झाली. Morning moraya या मथळ्याखाली रोज गणेशाचे नवे चित्र येत असे. त्यावर रोज नवी चारोळी  लिहून त्या पाठवत असत. आम्हालाही लिहिण्याची इच्छा निर्माण झाली. त्यांनी ही चित्रे ग्रूपवर पाठवण्यास सुरूवात केली. हा अद्भुत योग त्यांच्यामुळेच जुळून आला.अगदी 10-15 चारोळ्या सकाळीच 9 ते 10 वाजेपर्यंत वाचायला मिळतात.         प्रत्येकाला बाप्पा आपल्या दृष्टी प्रमाणेच दिसतो. लिखाणाची ढबही वेगवेगळी. भाव तोच, भक्ती तिच शब्दांकन मात्र वेगवेगळे. ना कसली स्पर्धा, ना कोणते बंधन! रोज सकाळी शब्दसुमनांनी बाप्पाची पूजा! नवलेखकांना विद्याधीश गणेशाचा जणू आशीर्वादच हा.         यामुळे  चित्र कवितांचा नवा छंदच जडला. सगळ्यात महत्वाचे म्हणजे ठाण्यातील कलाकार श्री. दिलीप वैती सर ही चित्रे पाठवतात. त्यांच्या व्यस्त दिनचर्येत नवी जबाबदारीच.या सगळया  त्या दिवशीच्या कवितांचे ते पी. डी. एफ. ही बनवूनही पाठवतात.त्यांनी पाठवलेली चित्रे पाहून आम्ही अगदी स्तिमित होऊन जातो.केवढी रूपे बाप्पाची! या चित्रांसाठी वैती सरांचे व विश्वविन