पोस्ट्स

गणेश

इमेज
 

संकष्ट चतूर्थी

इमेज
 

गणेश

इमेज
 

तूच बेभान व्हावे

इमेज
  *छंदोरचना  *तूच बेभान व्हावे* तनाने भिजावे मनाने भिजावे अशा श्रावणी खास पाऊस धारा असा मास आला जगी उत्सवाचा क्षणी ऊन येई क्षणी चिंब धारा धरेने नहावे तरुंनी नहावे पुन्हा जीवनाचा नव्याने सहारा तृणांनी दवांच्या मण्यांना धरावे धुमारे मनाला जलाचा शहारा नदीने झऱ्याने खळाळा वहावे सरी नाचताना सुखाचा नजारा घनांच्या पखाली झडींचे तराणे घुमे गर्द रानात ओलाच वारा सणांच्या दिसांनी घराने खुलावे सवे फेर घ्यावे नवे गीत गावे सजावे धजावे मुलींनी सुनांनी सग्यांच्या मधे जीवनी बागडावे धरित्रीतल्या गंध मोदात साऱ्या मनुष्या अरे तूच बेभान व्हावे ऋतू संगतीने जगी सुंदराने कधी काव्य व्हावे कधी नृत्य व्हावे अर्चना मुरूगकर

गणेश

इमेज
 

गणेशा

इमेज
 

गझल

इमेज
  अननज्वाला ८+८+८ माहेराची कणखर छाया असते राखी रेशमधागे कोमल लेवत सजते राखी भाऊराया रक्षणकर्ता बहिणीपाठी चिंता सरुनी हृदयामध्ये ठसते राखी समृद्धीचे दान मागते भावासाठी नात्यांमधले प्रेम पाहुनी हसते राखी कृष्ण सुभद्रा कर्मवतीचा अम्हा वारसा दोन घरांचे हीत जाणुनी जपते राखी वर्धन होते दृढ प्रेमाचे जगतामध्ये आनंदाने मनात येथे वसते राखी अर्चना मुरूगकर