खरे ब्रह्मकमळ

        

       खरे ब्रह्मकमळ (सौस्सुरीआ ऑबव्ह )   आणि   क्वीन ऑफ  नाईट






क्वीन आॅफ  नाईट 

कुंडीमध्ये  लावलेले ब्रह्मकमळाचे एक झाड घरी आहे. दरवर्षी  ब्रह्मकमळाची फुले येत असतात. अगदी सोळा-सतरा वर्षापासून. प्रत्येक वेळी तेवढेच अप्रूप वाटत असते. छोटीशी कळी आली तसे आमच्या सगळ्यांचे तिच्याकडे लक्ष असते. आणि ती अचानक टपोरी बनते. आज रात्री ब्रह्मकमळ फुलणार याचा सगळ्यांना आनंद होत असतो. आणि अगदी संध्याकाळी सात-आठ पासूनच झाडाकडे आमचे लक्ष असते.   फूल हळूहळू उमलताना पाहतो आणि पूर्ण उमलले की काय आनंद ! खरोखरच खूप वेगळे फूल आहे. आकाराने मोठे, पांढरा शुभ्र रंग, तलम पाकळ्या, पांढऱ्या ताऱ्या सारखे हे फूल दिसते. ही फुले वर्षातून एकदा जुलै ते सप्टेंबर  च्या दरम्यान , मध्यरात्रीच्या सुमारास पूर्णपणे उमलतात सकाळपर्यंत कोमेजून जातात. एकाच दिवशी सगळ्यांच्या घरातील ब्रह्मकमळे फुलतात हे पण  एक वैशिष्ट्यच! फुलांचा  पांढरा रंग, मादक सुगंध मध्यरात्रीचे उमलणे  यामागे कीटकांना पराग सिंचनासाठी आकर्षित करण्याचा हेतू असतो.



Scintific name : Epiphylum oxypetallum

Family: Cactaceae

Popular name: orchid cactus

Queen of the night

Epiphyllum refers to leaf borne plant.

Oxyetallum refers to acute petals.

                            




ही वनस्पती मूळची  श्रीलंका येथील आहे. थोडा वेगळा प्रकार  मेक्सिको , ब्राझिल, व्हेनेझुएलामध्ये आढळतो.ब्रह्मकमळाची धार्मिक वैशिष्ट्येही आहेत. याचे एक कारण म्हणजे या फुलाचे नाव ब्रह्मदेवाच्या नावावर आहे

या फुलाचे घरामध्ये फुलणे हे शुभ मानले जाते .

निलगिरी च्या जंगलात गुलाबी रंगाची ब्रह्मकमळे आढळतात. ही फुले दिवसा उमलतात.

कुंडीमध्ये पाने लावून  याची लागवड करता येते.

जेव्हा हे कळले की खरे ब्रह्मकमळ दुसरेच आहे तेव्हा  माझा अगदीच भ्रम निरास झाला .

पण निसर्गाने दिलेले सगळेच सुंदर. निवडूंगाचे फुलही.

 

खरे ब्रह्मकमळ (सौस्सुरीआ ऑबव्ह )



खरे ब्रह्मकमळ (सौस्सुरीआ ऑबव्हॉल्लाटा):

ब्रह्मकमळ या फुलाबद्दल दोन मतप्रवाह दिसतात.

काही लोकांच्या मते  Saussurea obvallata ही वनस्पती खरे ब्रह्मकमळ आहे. हे उत्तराखंडचे राज्य फुल आहे. एक फुटापर्यंत वाढणारी वनस्पती आहे

यांचेही कीटकांद्वारे परागीकरण होते .जुलै ते ऑगस्ट दरम्यान ही फुले दिसतात. ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत ही फुले दिसतात, त्यानंतर ही वनस्पती नष्ट होते आणि एप्रिल मध्ये पुन्हा दिसू लागते.

Scientific name: Sassures obvallata

Family: Asteraceae

Local name : Brahma Kamal, Kon.

सूर्यफुलाच्या कुळातील हे फूल असून जुलै ते ऑगस्ट दरम्यान याचा बहर असतो. फुलांच्या दरीमध्ये व्हॅली ऑफ फ्लॉवर्स मध्ये हे येते. उत्तराखंडमध्ये हेमकुंड साहेब येथे हे ब्रह्मकमळ जूनच्या शेवटच्या आठवड्यात हजेरी लावते. या फुलाचे वरचे टोक जांभळ्या रंगाचे असून हिरव्यापिवळ्या  कागदी प्रदल मंडलात गुंडाळ्या सारख्या दिसतात . हिमवृष्टीतही मुख्य फुलाच्या आतील तीन-चार छोट्या फुलांचे संरक्षण व्हावे यासाठी ही रचना आहे. हे तीन-चार फुलांच्या गटांमध्ये आढळते

हे हिमालयातले फूल उत्तराखंड राज्याचे राज्य पुष्प आहे . बद्रिकेदारच्या आणि केदारनाथाच्या मंदिरात देवाला ब्रह्मकमळ वहायची परंपरा आहे .त्यामुळे त्याला देव पुष्प म्हणतात. 

श्री विष्णूच्या नाभीतून उगवलेल्या कमळावर विराजमान झालेल्या ब्रह्मदेवाच्या हातात हे बघायला मिळतं आणि म्हणून त्याचं नाव ब्रह्मकमळ.


तिबेटच्या औषध उपचार पद्धतींमध्ये या संपूर्ण झाडाचा उपयोग होत असल्याने हे सर्वांग सुंदर फुल हल्ली नष्ट व्हायच्या मार्गावर आहे.

मूत्रसंस्था जनन संस्थेतील इंद्रिय विकारांवर याचा उपयोग केला जातो.

सध्या दुर्मिळ होत चाललेले हे फूल वाचवण्यासाठी या ब्रह्मकमळाच्या रोपाला संरक्षित रोपाचा दर्जा देण्यात आला आहे.




रामायणात युद्धामध्ये जेव्हा लक्ष्मण बेशुद्ध पडले होते हे तेव्हा मारुतीराया लंकेतून थेट ज्याजागी अवतीर्ण झाले होते  तीच ही जागा व्हॅली ऑफ फ्लॉवर्स .आजही अनेक दुर्मिळ वनौषधी या दरीत सापडतात.

भगवान शिव यांनी आपला मुलगा गणेश यांच्यावर हत्तीचे डोके ठेवले, पार्वतीने ब्रह्माजीला जीवन देण्याची प्रार्थना केली. ब्रह्माजींनी तिला ब्रह्मकमळ भेट म्हणून दिले आणि गणेशाने जेव्हा ब्रह्म कमळातून शिंपडलेल्या पाण्याने स्नान केले तेव्हा ते पुन्हा जिवंत झाले! ब्रह्मदेवाने दिले, म्हणून ब्रह्मकमळ .

(src:http://www.dadazi.net/choto/pindnsdnl/mahabharata/mahabk07/mahapg172.jpg)

महाभारतात दुर्योधनाच्या अपमानानंतर द्रौपदी दुःखी झाली. एका संध्याकाळी उशीरा हिमालयातील नदीजवळ बसली असता तिला अचानक एक सोनेरी, चमकणारे कमळ उमलताना दिसले. हे पाहून तिला एका दिव्य आनंदाची अनुभूती आली. ते सुंदर फुल म्हणजे ब्रह्मकमळ होय !

आजही केदारनाथ आणि बद्रीनाथ मंदिरात हे मनोकामना पूर्ण करणारे पुष्प अर्पण करतात.

सर्वांना आवडणाऱ्या व उत्सुकता असणाऱ्या अशा या ब्रह्मकमळाची माहिती या लेखातून आपणा सर्वांना मिळाली असेल अशी मी आशा करते.

सौ. अर्चना मुरूगकर


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

देवीची नऊ रूपे

जाणता राजा