उपवास म्हणजे नेमकं काय ???

                                      

 
 


              'उप-वास 'म्हणजे मन व शरीर शुद्धीचा यज्ञ आहे.

     'उप 'म्हणजे जवळ, आणि 'वास' म्हणजे वास्तव्य. याचा अर्थ देवासाठी केलेले उपवास म्हणजे परमेश्वराच्या जवळ राहणे.

   भारतीय आणि उपवास यांचे नाते आपण चांगलेच जाणून आहोत ,त्यातही इतर गोष्टींप्रमाणेच महाराष्ट्र यातही आघाडीवर आहे. 

     आयुर्वेदानुसार उपवासामुळे आपला जठराग्नी पुन्हा प्रज्वलित होतो. ह्या जठराग्नीतील वाढ आपल्या शरीरातील टाकाऊ विषकण नष्ट करते. हे टाकाऊ विषकण शरीराच्या बाहेर घालविले जातात, त्यामुळे सुस्ती आणि मंदपणा कमी होतो. शरीरातील पेशीपेशीत नवचैतन्य जागृत होते. त्यामुळेच, उपवास हा शरीरशुद्धीसाठी प्रभावी उपचार ठरलेला आहे. जेव्हा शरीर शुद्ध होते, तेव्हा मन सुद्धा अधिक शांत आणि स्थिर होते, कारण शरीर आणि मनाचा गहिरा संबंध आहे.
     बहुदा, आपल्यापैकी बरेच लोक भूक लागण्याची वाटच बघत नाही. भूक लागणे म्हणजे आपले शरीर अन्न पचविण्यासाठी आता सज्ज आहे हे दर्शविण्याचा त्याचा मार्ग आहे. भूक लागण्यापूर्वीच खाल्ल्यामुळे आपली पाचनप्रणाली अजून दुबळी होते, परिणामी ताण वाढतो आणि रोगप्रतिकारक शक्ती मंदावते. उपवासाने आपला जठराग्नी अजून प्रदीप्त होत असल्यामुळे, तणाव कमी होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
       उपवास म्हणजे शरीराला बाहेरून आहार देणे थांबविणे. त्यामुळे शरीरातील उत्सर्जनीय घटक शरीराबाहेर टाकण्याची क्रिया वेगात होते व अग्नीला आहार नाही दिला तर तो वाढलेल्या दोषांचे पाचन करतो.
लंघना ने सुद्धा वाढलेल्या दोषांचे पाचन होऊन स्रोतोरोध कमी होतो . शरीराला हलकेपणा जाणवतो , भूक चांगली लागते , प्रसन्नता , उत्साह व रोग प्रतिकारशक्ती वाढते.

उपवासामुळे शरीराच्या चयापचय संस्थेवर सतत पडणारा ताण कमी होतो. 

                          गरम पाणी

 उपवासाला साबुदाणा, रताळी, बटाटे,शेंगदाणे असे पदार्थ  न खाता ,गरम पाणी प्यावे  आम कमी करण्यासाठी छान काम करते. 




  मध


मध आमाचे पाचन करतो 
पण शुध्द मिळाला तर सेवन करावे.
 पॅनकेकवर (घावनावर)स्प्रेड करता येतो. 
फळांच्या फोडींवर, सॅलड मध्ये टाकता येतो. 


ताक

ताक स्वभावता: रुक्ष आहे 
त्यामुळे ते वात आणि कफाला
 परिणामी आमाला कमी करते . 
ज्यांना ताकाचा त्रास होतो त्यांनी जिरे ,सेंधव, 
(सुंठ पावडर) आले,घालून घ्यावे.
 वरीच्या भातासोबत ही खाता येईल. 


राजगिरा


राजगिरा लाडू पचायाला हलका, 
 ऊर्जा देणारा, बलवर्धक आहे. 
त्याचेही सेवन करावे.
 गरम दुधात मिसळून चवीला छान लागतो.
राजगिरा पीठाचे थालीपीठ, पॅनकेक, घावन किंवा शिराही बनवता येतो. 





गरम दूध

गरम गरम दूध घ्यावे. 
सुंठ, वेलची पावडर, जायफळ 
घातलेले दुध पचायला हलके होते. 

तूप 
तूप हे उत्तम अग्निवर्धक बलवर्धक 
पित्तशामक पचन सुधाणारे आहे.
तूपाचाही वापर करावा. 

वरई

वरईचे तांदूळ भाजून वापरावे. 
भाजलेले वरईचे तांदूळ पचायला हलके असतात. भाजलेले किंवा फुलवलेले अन्न (म्हणजे लाह्या) पचायला हलके असते.
 आतड्यांना चिकटलेला आम सोडवण्यात मदत होते. 




फळे व सुका मेवा
फळांमधे संत्रे , मोसंबी , डाळिंब  घ्यावे.
यापासून फायबर्स व व्हिटॅमिन मिळते. 
नारळपाणी अनेक क्षारांचा पूर्ती करते. 
सुकामेवा, खजूर यांचेही सेवन करावे. 
त्याचप्रमाणे खिरींमध्ये गुळाचाही वापर करावा. 






   



   उपवास सोडताना हळू हळू आहार वाढवावा काही जण उपवास सोडण्याच्या च्या दिवशी भरपूर खातात असे करू नये . उपवास म्हणजे काम क्रोध आदी दुर्गुणांचा परित्याग व सत्य अहिंसा सात्विक गुणांचे उपादान करणे होय .

आपण सतत काही ना काहीतर चुकीचे अन्नपदार्थ पोटात घालवत राहतो. त्याचा परिणाम  शरीरावर होऊन अनेक आजार निर्माण होतात. पण हे थांवबण्यासाठी आणि शरीराचं पचन आणि शरीराचं तंत्र व्यवस्थित ठेवण्यासाठी आपण उपवास करायला हवा. त्यामुळे तुमचं वय वाढतं. योग्य तऱ्हेने उपवास केल्यास, तुमचं वय निश्चितच वाढतं. कारण उपवासाच्या वेळी आपण शरीराला आवश्यक तितकाच आहार घेतो. अरबट चरबट खात नाही. त्यामुळे त्याचा चांगला परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. 



ज्यांची साखर अनियंत्रित राहते त्यांनी उपवास करू नये. जे आहार आणि व्यायाम यांचे संतुलन व्यवस्थित ठेवतात, अशा मधुमेहाच्या रुग्णांना उपवासाशी संबंधीत धोके कमी असतात. त्यामुळे असे व्यक्ती उपवास करू शकतात.


जे औषधीद्वारे साखर नियंत्रणात ठेवतात ते देखील नवरात्रीचे उपवास ठेऊ शकतात. मधुमेहाच्या रुग्णांना उच्च रक्तदाब तसेच जुलाबाचा धोका असतो, त्यामुळे त्यांनी उपवासात नारळ पाणी, निंबू पाणी, लस्सी घेतली पाहिजे. 

नवरात्रात अनेकजण मीठ वर्ज्य करतात. आठ-नऊ दिवस मीठाशिवाय राहिल्यास थकवा जाणवतो आणि रक्तदाब कमी होतो. त्यामुळे याकाळात सेंधव मीठ सेवन करता येईल.

    एकूणच शरीराची शुद्धी करून त्यामध्ये साठलेले सर्व हानिकारक घटक बाहेर पडावेत, तसेच पचनतंत्र सुरळीत चालावे यासाठी उपवास लाभकारी आहे.

सौ. अर्चना मुरूगकर. 











टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरे ब्रह्मकमळ

देवीची नऊ रूपे

जाणता राजा