चिऊताई ( बालकविता) 🐦🌾🕊🍂🌼

 




चिऊताई (बालकविता) 

घरी येई

चिऊताई

चिव चिव

करी बाई


बाबा आई

आजी ताई

मला पण 

खुशी होई


दाणे देती

आजी आई

रोज येण्या

चिऊ ताई


मीच खरी

युक्ती करी

झाडा रोज

दोस्ती करी


खत पाणी

मशागत

झाड वाढे

अंगणात


भुर्रदिशी

येई चिऊ 

घरटेही

बांधे मऊ. 


बागेमुळे

रोज येई

 चिव चिव

चिऊ ताई. 

 अर्चना मुरूगकर🌺🦜🌾🐦


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लेख मकरसंक्रांत

साहित्यातील राजकारण

हरकत नाही