लोकशाही भारत माझा

 

लोकशाही भारत माझा


लोकशाही भारत माझा

 आजही कागदावरच राहिला

 धार्मिक तेढ समाजगुंता

  रोज वाढतच राहिला. 


हौतात्म्य वीरांचे कर्तव्य

रोजची दिवाळी सीमेवर

वाट्टेल त्यासाठी भांडती

स्वार्थी देशकर्ते माईकवर


भ्रष्टाचार शिष्टाचार मानून

वाढवावेत उद्योग स्वत:चे

 यात साथ देईल तोच नेता

आणि सरकार त्याच पक्षाचे


जाणत्या शिकलेल्यांना कुंपणे

केव्हाच झाली अंथरुणे छोटी

मुलांचे शिक्षण, छोटेसे घर

धावत रहाती मिळावाया रोटी


शेतकरी कधीचाच हरला

हरतोय आता तरूण आमचा

आदर्श राष्ट्राची कोसळती स्वप्ने

रस्ता धरतोय परदेशाचा. 


 बनवू स्वराज्याचे सुराज्य

करूनी संविधानाचे पालन 

हृदयी देशभक्ती जाज्वल्य 

सदैव वाढवू तिरंग्याची शान. 


अर्चना मुरूगकर. 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लेख मकरसंक्रांत

साहित्यातील राजकारण

मावळ सौंदर्य आणि सोनकुसूम पुष्पौत्सव' :