अबोली
अबोली
रंग हिचा अबोली
भाषा असे अबोल
सुंदर दिसे फूल
नाजूक नी अबोल
सदा असे गूपचिळी
मनीचे भाव ना खोली
मैत्रिणींच्या घोळक्यात
कुजबुजते सानूली
वेणीवर माळायला
आवडते ललनांना
मोगरा हिरवी पाने
मिळून गुंफती त्यांना
रंग असे वेगळा
नसे सुगंध जरी खास
शांत फुले वाहू देवास
मनात स्थान असे खास
Masta
उत्तर द्याहटवा