प्रदूषण
*प्रदूषण टाळा अन्यथा विनाश अटळ* नमस्कार.. पर्यावरण म्हणजे जिवाच्या आजूबाजूचा परिसर! याचा जिवावर परिणाम होतो तसाच जिवाचाही पर्यावरणावर परिणाम होतो. अरण्यात राहणारा माणूस ते आजचा माणूस यात खूप फरक झाला आहे. तसाच पर्यावरणातही फरक झाला. निसर्गाशी संलग्न असे जीवन जगणारा माणूस ते निसर्गाचा फक्त उपभोग घेणारा माणूस असा बदल प्रकर्षाने जाणवत आहे. तापमान बदल, मातीची झीज, ग्रीन हाऊस इफेक्ट, हवा प्रदूषण, पिण्याच्या पाण्याचे प्रदूषण, रासायनिक खतांचा वापर, हायब्रीड बियाणे, बायोटेक्नॉलॉजीचा फायद्यासाठी वापर ही सगळी पर्यावरण -हासाची उदाहरणे. याचे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. निसर्गातील संपूर्ण सजीव, निर्जीव घटकांवर याचा परिणाम होत आहे.आपली निसर्गपुजकाची संस्कृती! निसर्गाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कितीतरी सण आपण साजरे करतो. नदीला आई म्हणतो. देवी म्हणून पूजा करतो. पण हळूहळू ही प्रथा शिल्लक राहिली आणि त्यामागची पर्यावरण रक्षणाची भावना कमी झाली. आजच्या आपल्या राष्ट्रपती मा. द्रौपदी मूर्मू यांनी आदिवासी समाजाची ओळख करून देताना 'आम्ही निसर्गात राहणारे आणि...