मखाना (कमल बीज), माहिती आणि उपयुक्तता.
मखाना हे एक पौष्टिक आणि अनेक प्राकृतिक व औषधी गुणधर्माने युक्त असे कमळाचे बीज आहे. भरपूर प्रोटिन, कार्बोहायड्रेट, मँग्नेशिअम, फॉस्फरस, व पोटॅशिअमने युक्त असे मखाना आहे. या बियांना खास मंद सुगंध असतो. भारतात पूर्वापार खाल्ला जाणारा मखाना म्हणजे कमळाचं बी पुन्हा एकदा डाएटमध्ये सहभागी झाला आहे. मखाना खाल्यामुळे आरोग्य चांगलं राहतच पण त्याचबरोबर इतर अनेक फायदे होतात. मखाना हे हृदय व किडनिला हेल्दी ठेवतात. मधुमेहावर जर तुम्ही रोज चारच मखाने सकाळी रिकाम्या पोटी खाल्ले तर डायबेटिस कमी होतो. दैनिक आहारांत किमान २५ ग्रँम मखाना रोज खायला हवे. बाळंतिणीला पौष्टिक आहार म्हणून खिर, लाडु, वैगेरे स्वरूपात खायला देतात. वजन कमी करण्यासाठी आहे, त्यांच्याकरता मखाने खूपच फायदेशीर आहे. कारण याने पोट लवकर भरते. मखान्याच्या सेवनाने अनिद्रा, अस्वस्थ वाटणे, दूर होते. मखान्यात पोटँशिअम भरपूर मात्रेत असल्याने रक्तप्रवाह नियंत्रित राहतो. उच्च रक्तदाबावर अंकुश राहतो. यात सोडिअम अत्यल्प प्रमाणांत असते. मखाना ग्लूटेन, मुक्त आहे, व प्रोटिन युक्त आहे. ग्लायसेनिल इंडेक्स अतिशय कमी ...