पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मराठी राजभाषा दिन

इमेज
  मराठी राजभाषादिन पडे कानावर माझ्या भाषा आईच्या तोंडून असे सोपे आकलन ज्यात प्रेमाचे शिंपण झालो ऐकत सुजाण श्लोक भारूडे किर्तन खेळ खेळता अंगणी होई सहज शिक्षण कधी बेगडी फुलात होई मन सुगंधित?  व्यक्त भावना होण्यास बोला मातीच्या भाषेत कळे सभ्यता संस्कृती   माझ्या मुलुखाची मला माझ्या मातीचे सोहळे  ज्ञान सारे देती मला पोसू पिंड ज्ञानरूपी मराठीच्या दुधावर तिचा भक्कम आधार जग पाहू दूरवर धन्य शिरवाडकर केली मराठी जतन अभिमान मनी धरू सण राजभाषा दिन अर्चना मुरूगकर🙏🌺

विज्ञान दिवस

इमेज
 विज्ञान दिवस कोडे मनुष्य मनाला पडे सदैव सृष्टीचे  जाणू काय कोठे कसे  सप्रमाण विज्ञानाचे बनू कृतज्ञ थोरांचे दिल्या सुविधा जगाला गती दिली जीवनाला नव्या रिती जगण्याला नका बनू अंधश्रद्ध नाना शास्त्रे पडताळू  अहोरात्र संशोधन रोग लागतील पळू करू विवेक पालन  करू मानव्य रक्षण शस्त्र अस्त्र संशोधन नको शक्ती प्रदर्शन दूरगामी धोरणाने करू रक्षण सृष्टीचे  देऊ लेकरांना उद्या वाण सुंदर धरेचे श्रेष्ठ शास्त्रज्ञ रामन करू शोधाचे स्मरण देऊ विज्ञान वारसा वैज्ञानिक दृष्टिकोन  अर्चना मुरूगकर🌹 तळेगाव दाभाडे. 

वसंत ऋतू

इमेज
 अविरत चाले चक्र  होती ऋतूंचे बदल नित्य नूतनच भासे सृष्टीमाता सभोताल राजा ऋतूंचा वसंत नव पल्लव भूवर नव्या आशेची पालवी फुले चराचरावर करे वारा मनमानी गारठ्याला कंटाळून मंद सुगंध लेवूनी मोहरले आम्रवन पित पुष्प बहरले तन-मन आनंदात मन तरुणाई नाचे सृष्टी सौंदर्य भरात कुहूकुहू थुईथुई चाले गायन नर्तन सळसळ किलबिल फुलतसे पानपान

Ganesha

इमेज
पुष्पकेंद्र वसंती फुलाचे रंगीत बाप्पा आत विराजे केशिकांच्या जाळीमध्ये वरदमूर्ती अलंकृत साजे नभनिलीमा सुमुख सजले अंग माखले पळसरंगी   प्रेमगुलाबी शेला ल्याले कसूनी पितांबर हरितरंगी  तोडे अंगठ्या पैंजण कर्णअलंकार गुंजनयन रक्तवर्ण शिवगंध भाळी मयूरपंखी सोंड शोभायमान नयन देखती नवा सोहळा सृष्टी ल्याली पुष्पबहार नानारंगे नटू दे जीवन रंगवर्षा आशिष भक्तांवर अर्चना मुरूगकर🙏🌹 लाल पिवळ्या रंगाची होळी खेळून आले गणेश. मोदक खाऊन खेळाचा वाढला जोश व आवेश. या श्री दर्शनाने भक्त करिती रंगात जल्लोष. रमेश मुरूगकर. 🌹🌹🙏🏻🙏🏻   ओंकार रूपी गणेश   अ चे बने मस्तिष्क शरीर   उ ची लांब सोंड सुंदर   म आकाशी तेजज्योत गगनावर   म मराठी मातेचा   म मराठी भाषेचा   भक्तीपताका लहरती   दिन मराठी गौरवाचा अर्चना मुरूगकर 🙏🚩🌺 बाप्पा आज काष्ठ शिल्पाचे भस्मगंध त्रिपुंडी शिवपुत्राचे चंदनासम आशिष विघ्नहराचे चांदणे पसरवी शितलतेचे   अभक्ती दूर करत सश्रद्धाचे सदैव विद्याधिपती आशिषाचे आयुष्य बनो किर्तीगंधाचे चदनासम झिजत कर्तव्यकार्याचे.  अर्चना मुरूगकर🙏 🌺 भौम असे ...