*रविवार लेख उपक्रम* दि.२/४/२०२३ *अजूनही स्वयंपाक या प्रकारात स्त्रियांची मक्तेदारी आहे का?* खरे तर हा प्रश्नच अवास्तव आहे. आज स्त्रिया माझी ही मक्तेदारी आहे, कुणीही हस्तक्षेप करू नका असे सांगतच नाहिएत! ही फक्त स्त्रियांची जबाबदारी आहे का? हा प्रश्न योग्य वाटतो.असे अनेकांना वाटते. ज्यांच्या अंगवळणी घर पडले आहे त्या आई, आजी, सासू, नणंद, जाऊ इत्यादी सर्वांना.सून सोडून. पुरुषांनाही ही जबाबदारी फक्त स्त्रियांची आहे असे वाटू शकते, जेव्हा आयते हातात घेण्याची सवय लागलेली, लावलेली असते. खरे तर मुलांचे संगोपन, घरात सुरक्षित रहाणे यासोबतच हे आलेअसावे. युद्ध, शेतीतली कठीण कामे किंवा अध्ययन यापासून स्त्रिया दूर होत्या, नजीकच्या भूतकाळात. खरे तर स्वयंपाक हे पण शास्त्रच आहे. तो पण आपल्या माणसांसाठी प्रेमाने रांधावा लागतो. त्यात येणारे अनेक बारकावे, घरातल्यांच्या आवडीनिवडी जपाव्या लागतात. यासाठी निवांत वेळ, सराव, कौशल्ये, सहजता असे टप्पे येत जातात. राहिला प्रश्न स्त्री - पुरुष आणि स्वयंपाक असा! आता मुलींचे जीवन मुलांइतकेच नोकरीसाठी, कामधंद्...