पोस्ट्स

संधिकाल(कविता)

इमेज
 संधिकाल सोनगोल डोंगरात पक्षी क्षितीजा दिसती मंदावती ऊनज्वाळा. सूर्य दिसे मावळती.  खग संचार नभात मिठू-मिठू, चिव -चिव राघू दिसती थव्यात आसमंती गुंजारव.  नभी निलिमा लालिमा शांत, शीतल लहर होती डोंगर धुसर कुहू कोकीळ लकेर. पक्षी खेळती नभात येती पारवे बगळे दिसे गंमत शर्यत घार, काक,चिऊ पळे. एक क्षण पश्चिमेचा एक शांत संधिकाल येई निशेची चाहूल सारा सावल्यांचा खेळ.

चिऊताई ( बालकविता) 🐦🌾🕊🍂🌼

इमेज
  चिऊताई (बालकविता)  घरी येई चिऊताई चिव चिव करी बाई बाबा आई आजी ताई मला पण  खुशी होई दाणे देती आजी आई रोज येण्या चिऊ ताई मीच खरी युक्ती करी झाडा रोज दोस्ती करी खत पाणी मशागत झाड वाढे अंगणात भुर्रदिशी येई चिऊ  घरटेही बांधे मऊ.  बागेमुळे रोज येई  चिव चिव चिऊ ताई.   अर्चना मुरूगकर🌺🦜🌾🐦

फुलराणी (कविता)

इमेज
प्रभातसमयीची लगबग चालली सूर्याला पहाण्यास कळी निघाली सुगंध पसरवत हळूच उमलली वर्षाराणी आकस्मिक अवतरली पर्जन्यतूषारांत कळी न्हावून निघाली सर्वांगी फूलत डोलू लागली हिरेजडित मुकूट ल्याली  आणि दिमाखदार राणीच ती भासली ||

कृष्णवर्ण (कविता)

इमेज
  रंग रात्रीचा ,छायेचा.  रंग पक्ष्यांचा, प्राण्यांचा रंग मातेच्या गर्भाचा रंग छायेचा, घनाचा       रंग चिंतेच्या तापाचा दुखवटा, निषेधाचा काळ्या कुकारस्थानांचा रंग दुष्टांच्या भावाचा   नसे भेद रंगांचा सृष्टीत शक्ती असे प्रश्वा मृदेत  कणखर कातळात दिसे त्वचा, केश,नेत्रात श्याम श्रीकृष्ण सुंदर कृष्ण जळ यमुनेचे कृष्ण रूप कालिकेचे रूप सावळे विठूचे रंग शाळेच्या फळ्याचा तरूणांच्या आवडीचा टागोरांच्या 'श्यामल'चा  परिधान संक्रांतीचा. 

सण म्हणजे काय ❓

इमेज
सण म्हणजे काय❓ सण ठेवा संस्कृतीचा  जगण्याची रीत कळे समन्वय निसर्गाशी मानवाचा सणांमुळे शेतकरी आणि शेती असे निसर्ग  सांगाती  निसर्गाची करी पूजा कामा संगे बळीराजा.  बनू नका अंधश्रद्ध सणामागे असे शास्त्र संस्कृतीचे संवहन करा उघडे ठेवून नेत्र.  नका आणू कर्मठता जाणा सणाची महत्ता वनौषधी  पुष्पलता जगा देऊ सात्विकता.  नको नासाडी पैशाची अन्नौषधी नैवेद्याची मैत्री करा आप्तेष्टांची हिच महती सणांची.

चंद्र (कविता)

इमेज
  चंद्र🌜🌟 प्रतिक असे शीतलतेचे शीतस्त्रोत प्रकाशाचा  मस्तक शोभे शिवगणेशाचे  संदेश देई शांततेचा भासे कुणा वदन प्रेयसीचे   संपे काळ प्रतिक्षेचा खास नाते पृथ्वीचे त्याचे   चांदोमामा बालकांचा सौंदर्य खुले आकाशाचे   प्रियतम तारकांचा खेळ असे सावल्यांचा सखा पृथ्वीवासियांचा गूढ अस्तित्व लोभसतेचे लाडका कवींचा || .....अर्चना

माझ्या चारोळया

इमेज
   चार ओळी (four lines)मध्ये लिहल्या गेलेल्या कविता म्हणजे चारोळी.  चारोळी काव्याचा आकृतिबंध नावांतच सामावलाआहे.      चारोळी काव्यप्रकारात २ऱ्या व ४ थ्या ओळीत यमक साधल्या जाते,त्याचबरोबर काही वेळा सर्वच ओळीत यमक साधल्या जाते.    सहज तुलना केली तर,स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या चारोळी या पदार्थांशी नाव व गुणातही सार्धम्य साधल्या गेल्याचे दिसते.त्यामुळे चारोळी कविता म्हणजे अल्पाक्षरी, छोटा आकृतिबंध व त्याचबरोबर चारोळी या पदार्थासारखा पौष्टिक, गुणवर्धक व मनाला शांती देणारा असे म्हणण्याचा मोह होतो.      चारोळीत कवी एखादा प्रसंग,विषय मांडतात,सारांश सांगतात व ती पूर्ण कविता असते.मी इथे काही चित्र चारोळ्या पोस्ट करत आहे.  धन्यवाद