पोस्ट्स

आशा

इमेज
 अष्टाक्षरी कविता विषय-आशा आशेवर चालतसे जग सारे मनुष्याचे आज नाही उद्या तरी  दिस येतील सोन्याचे आशा दर्शन उर्मीचे श्रद्धा आणिक भक्तीचे तिच्या पायी बळ मिळे जगी श्रमाला शक्तीचे ढग गडद दाटती निराशेत काळोखाचे बुडणाऱ्या गलबता जग दिसे किनाऱ्याचे पायी वारकरी चाले आस अंतरी भेटीची रोज माऊली चालते वाट घाईने घराची आशेवर भविष्याच्या मायबाप कष्ट करी वाट पाही लेकराची अखेरचा श्वास जरी.  अर्चना मुरूगकर.

Ganesh

इमेज
'अ' कारअसे गजमुख  दावी बीज आधार 'ऊ'कार असे शुंड  जसे भक्ती मूळ खोलवर 'म'कार गंध शोभे  वाढता अंकुर भूवर आद्यप्रणव रूपात महत्व बीजांकुरणाचे महत्व पुनरुत्पादनाचे रूप शोभे लंबशुंडाचे नमन सुप्रभाती असे पितउर्जा प्रदात्या रवीला भक्तीमळा हिरवा फुलवी ओंकाररूपी बीजाक्षराला त्र्यक्षर असे आद्य प्रणव ब्रह्मा विष्णू महेशाचे रुप वेदातील ऋचांचे आधार  बीजरूप दावी स्व स्वरूप अर्चना मुरूगकर🙏🌺  

लोकशाही भारत माझा

इमेज
  लोकशाही भारत माझा लोकशाही भारत माझा  आजही कागदावरच राहिला  धार्मिक तेढ समाजगुंता   रोज वाढतच राहिला.  हौतात्म्य वीरांचे कर्तव्य रोजची दिवाळी सीमेवर वाट्टेल त्यासाठी भांडती स्वार्थी देशकर्ते माईकवर भ्रष्टाचार शिष्टाचार मानून वाढवावेत उद्योग स्वत:चे  यात साथ देईल तोच नेता आणि सरकार त्याच पक्षाचे जाणत्या शिकलेल्यांना कुंपणे केव्हाच झाली अंथरुणे छोटी मुलांचे शिक्षण, छोटेसे घर धावत रहाती मिळावाया रोटी शेतकरी कधीचाच हरला हरतोय आता तरूण आमचा आदर्श राष्ट्राची कोसळती स्वप्ने रस्ता धरतोय परदेशाचा.   बनवू स्वराज्याचे सुराज्य करूनी संविधानाचे पालन  हृदयी देशभक्ती जाज्वल्य  सदैव वाढवू तिरंग्याची शान.  अर्चना मुरूगकर. 

नमन

इमेज
अंधारातून नित्य येतसे एक सूर्य कवडसा तेजाळण्या वसुंधरेला घेतला जणू वसा तेज सुवर्ण लडींचे गुंफले गोफसुत्र वरदायी बाप्पा आशादायी चित्र जास्वंद फूल आवडीचे केले मनन पूजन परागातील लोलकाचे दिसते गंध छान वक्रतुंड एकदन्त बैठक पद्मासन कृपाप्रसादाने होवो अल्पमतीचे बुद्धीवर्धन. नभी उंच फडकला तिरंगा मंगल मम आराध्याचे दर्शन गंध शोभे संविधान भक्तीचे साजरा करू प्रजासत्ताक दिन.  टिळा जाज्वल्य देशप्रेमाचा बनवूया स्वराज्याचे सुराज्य गणाधिपती आशिष आम्हा तिरंग्याची सदैव वाढवू शान.  अर्चना मुरूगकर🙏 🌺  

गणेश चारोळ्या

इमेज
 

लालिमा

इमेज
 

Gazal

इमेज