पोस्ट्स

कोसळती स्वप्ने

इमेज
कोसळती स्वप्ने  लोकशाही भारत माझा  आजही कागदावर राहिला  धार्मिक तेढ समाजगुंता   रोज वाढतच राहिला.  हौतात्म्य वीरांचे कर्तव्य,  रोजची दिवाळी सीमेवर वाट्टेल त्यासाठी भांडती स्वार्थी नेते माईकवर भ्रष्टाचार शिष्टाचार मानून वाढवावेत उद्योग स्वत:चे  यात साथ देईल तोच नेता आणि सरकार त्याच पक्षाचे जाणत्या शिकलेल्यांना कुंपणे केव्हाच झाली अंथरुणे छोटी मुलांचे शिक्षण, छोटेसे घर धावत रहाती मिळावाया रोटी शेतकरी कधीचाच हरला हरतोय आता तरूण आमचा आदर्श राष्ट्राची कोसळती स्वप्ने रस्ता धरतोय परदेशाचा.  अर्चना मुरूगकर.

माझे हायकू भाग-३(विषय-प्रेम)

इमेज
  🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

माझे हायकू (भाग-२)

इमेज
    🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼   🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 नकळत नजरांची भेट होते. मनेही नकळत जुळतात.  हे सगळे त्या नजरांचा नजराणा, नजरांचाच गुन्हा. 🤩😇👁👁👀 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼         तरीही ही नकळत होणाारी नजरानजर दोन मनांना मात्र     जोडते.      कुठल्याही इतर सोपस्कारांशिवाय. अगदी सहजतेने.      गुपचूप . आकर्षणांची स्पंदने मात्र हृदयात धडधडू लागतात.   🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼       पहिल्या प्रेमाच्या आठवणी. नेहमी स्मृतीत राहणाऱ्या.         कधी मिळते तर कधी दुरावते.आठवणी मात्र अलवार       जपलेल्या.मन त्या आठवणींमध्ये क्षणभर तरी नक्कीच      गुंतते.    🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼      प्रेमांची भाषा ही प्रेमिकांनाच समजणारी आहे.       इतरांनी अन्वयार्थ लावून ती समजणारी नाही.       समाजाचे प्रत्येक ठोकताळे लाग...

(अष्टाक्षरी कविता ) आस प्रेमाची

इमेज
  आस प्रेमाची जीव जीवाला भेटती आस असे मिलनाची येई मोदाला भरती  भेट नदी सागराची आस नित्यची प्रेमाची असे आतल्या मनाची प्रीत असो पन्नाशीची किंवा कोवळ्या विशीची.  रीत नकळे जगाची  नच काळाची वेळाची खरी प्रचिती प्रेमाची  रंगी रंगल्या रंगाची.  फित आठवे स्मृतीची  गाली फुले गुलाबाची दाही विरह जीवाला कळ उरी वेदनेची.    फक्त मनाचा व्यापार नाही गरज नात्यांचीआ आस वीजेला भुईची  मधुकरा सुमनांची.  अर्चना मुरूगकर.

वैज्ञानिक संत

इमेज
  वैज्ञानिक संत झाडू मडके हातात बाबा गावोगावी फिरे साधे संवाद कीर्तनी करी गाव स्वच्छ सारे.  खरा वैज्ञानिक संत अंधश्रद्ध समाजाचा परखड उपदेश संत गाडगे बाबांचा.  रीन कोणी काढू नका जादूटोणा मानू नका द्यावे शिक्षण मुलांना देव माना माणसांना सुधारक समाजाचा व्यवहार सचोटीचा नदी घाट, धर्मशाळा रूग्णालये निर्मिकाचा.  घ्यावा सुज्ञान जणांनी वसा समाज कार्याचा थांबलेल्या विकासाचा स्वच्छतेचा, शिक्षणाचा.  अर्चना मुरूगकर. 

प्रेम (मधुसिंधू काव्यप्रकार)

इमेज
 प्रेम तुझ्याशी प्रेम  स्पंदन मनाचे भाव अंतरीचे ओढ अनाम.  संदेश देते मनाच्या शाईने लगेच घाईने उरी भेटते.  दाखवी रस प्रत्येक बाबीत दोघांच्या लयीत पेहरावात.  नको अबोला विरहाचे भय धरूनी संशय खंड प्रितीला.  सांज सावळी आठव मनात मनाच्या डोहात कातरवेळी.  अर्चना मुरूगकर. 

काव्यांजली चारोळी..विषय -काव्य

इमेज
  काव्यांजली चारोळी विषय -काव्य 📝काव्यलेखन कविता लेखन मनाच्या लयीचे अवलोकन अंतरंग जाणून आलेखन. 📝रचना रचना कवितेची मन उतरे कागदावर भावना हळूवार हृदयाची. 📝 भावतरंग मनाचे अंतरंग बनून येई कविता सोडवण्या गुंता भावतरंग.  📝चंचल मन कविता चंचलतेची असे तरूण वयाची उर्जा, प्रेमाची फुलपाखराची. 📝बोबडे बोल नवकवीचे कवन अवखळ, सरळ,मुक्त. भावनाच फक्त विनानियमन.