पोस्ट्स

काव्यांजली चारोळी( विषय-प्रेम)

इमेज
  काव्यांजली चारोळी 🌹प्रेम माझे प्रेम पाखरू होऊन भेटते तुझ्या मनाशी क्षणात.  🌹कातळ भेटावे कशाला नसे आशा प्रेमाची मनाच्या प्रितीची कातळाला.  🌹खोटे बहाणे बहाणे खोटेच आणा भाका शपथांचे न भेटण्याचे प्रेमिकांचे 🌹विरह दुरावा देई आठव त्या प्रेमाचा कढ भेटीचा  विरहात.  🌹अनुराग लटका राग मनी काळजी,जिव्हाळा. खोटा सोहळा अनुराग.  🌹मनोमीलन पूर्तता प्रेमाची नसे फक्त भेटीत सर्वस्व देण्यात मनोमीलनात.  अर्चना मुरूगकर. 

संवाद (कविता)

इमेज
 

जीवाची भेट (कविता)

इमेज
  जीवाची भेट वेडा बोलतो स्वप्नात   पुन्हा एकदा मित्रांशी खूप हसतो गप्पांत  झडतात हास्य राशी.  सत्यात जाणतो मग हरवले  मागे सारे  जरी  हजार कारणे झाले भूतकाळ सारे.    अहंकार आड येई कधी स्तर समाजात जरी सुदामा-श्रीकृष्ण होते सारे पुराणात.  वर्तमान गुंतलेला असे कामाच्या घाईत बंधनाच्या चाकोरीत सहकारी मेळाव्यात.  वेळ काढावा थोडासा द्यावा दिलासा मनाला  यंत्रवत जीवनात भेटा आपल्या जीवाला.  अर्चना मुरूगकर.

अबोल प्रीत(कविता)

इमेज
 अबोल प्रीत प्रितीच्या फुलाने सुगंधित व्हावे जराशी उधाने मनाची पहावी जगाला नसावा सुगावा जराही. मनाला मनाची धडाडी कळावी. तुला लागले की मला दु:ख व्हावे अबोल्या त ही भाव सारे कळावे मुक्या भावनांचे शहारे फुलावे मनासी मनाचे धुमारे मिळावे. नसे प्रीत सारी असे मीलनात जगा दावण्या साथ सारी जगात निराळेच गाणे असावे गळयात कळावी खुशाली सख्याची जगात उगा लाजणे आठवांच्या महाली फुलांच्या झुल्याशी फुकाचे झुलावे लगामे नसावी कुणाची कुणाला  प्रितीला,   दिलाच्या, दिलाने, जपावे.     अर्चना मुरूगकर

बालपण (कविता)

इमेज
 बालपण असे नित्य मजेचे संस्काराचे, प्रेमळतेचे हट्ट पुरवितीआई बाबा काका मामा लाडक्यांचे.  भावंडांची प्रेमळ माया भांडण मस्ती, नंतर शिक्षा आंबट गोड चवीचे जीवन सहज मिळावी समाज दिक्षा.  मातुलघरची दंगामस्ती लग्नघराची धमाल मस्ती मनात राही अवीट गोडी किल्मिष सारे दूरच असती.  सखेसोबती निव्वळ सोबत गप्पांसंगे चालत-बोलत जीवन सारे आनंदाचे प्रत्येकाच्या बालपणीचे.  अर्चना मरूगकर

मेतकूट

इमेज
           कन्नडमधील 'मेंथे हिट्टूचा' अर्थ  “मेथी पावडर” असतो. यापासून मेतकूट हा शब्द वापरात आला असावा. पण अहो थांबा .. तुम्ही नाक मुरडू नका. ही भुकटी अजिबात कडू नाही… खरं तर भाजलेल्या मेथी पावडरला एक वेगळाच सुगंध असतो.     "मेतकूट" हा मराठमोळा चविष्ठ पदार्थ !! मऊभात,साजूक तूप आणि वरुन मेतकूट आहः !! याची सर तर कशालाच नाही.     मेतकूट हा शब्द 'मेतकूट जमणे' या वाक्प्रचारातच ऐकलेला होता. तो खाद्यपदार्थ ही आहे. त्यामुळे मेतकूट या शब्दाला एक विनोदी छटा माझ्या लेखी आहे. त्याचा अर्थ लफडे, भानगड, प्रेम असाही आहे. त्या विषयी जे वाचले त्यावरून 'मेतकूट भात' हेच फक्त एक दुजे के लिये आहेत असे लक्षात आले.        जेवणाच्या सुरुवातीच्या काळात लहान मुलांना ते दिले जाते म्हणून ते मसालेदारही  नसते. तसेच भाताबरोबर वरण करण्याच्या कंटाळ्याला तो   पर्याय असावा ,असेही वाटते.  पावसाळ्यात रात्री नुकता कुकर मधून काढलेला                गरमागरम वाफाळता भात, त्यावर तुपाची धार, मीठ,     लिंबू    आणि मेतकूट...अहाहा स्वर्ग सुख.... मेतकुटात कांदा, कोथिंबीर घालून थालीपीठ पण छान होते. आ

मखाना (कमल बीज), माहिती आणि उपयुक्तता.

इमेज
  मखाना हे एक पौष्टिक आणि अनेक प्राकृतिक व औषधी गुणधर्माने युक्त असे कमळाचे बीज आहे. भरपूर प्रोटिन, कार्बोहायड्रेट, मँग्नेशिअम, फॉस्फरस, व पोटॅशिअमने युक्त असे मखाना आहे. या बियांना खास मंद सुगंध असतो.  भारतात पूर्वापार खाल्ला जाणारा मखाना म्हणजे कमळाचं बी पुन्हा एकदा डाएटमध्ये सहभागी झाला आहे. मखाना खाल्यामुळे आरोग्य चांगलं राहतच पण त्याचबरोबर इतर अनेक फायदे होतात.  मखाना हे हृदय व किडनिला हेल्दी ठेवतात. मधुमेहावर जर तुम्ही रोज चारच मखाने सकाळी रिकाम्या पोटी खाल्ले तर डायबेटिस कमी होतो.   दैनिक आहारांत किमान २५ ग्रँम मखाना रोज खायला हवे. बाळंतिणीला पौष्टिक आहार म्हणून खिर, लाडु, वैगेरे स्वरूपात खायला देतात. वजन कमी करण्यासाठी आहे, त्यांच्याकरता मखाने खूपच फायदेशीर आहे. कारण याने पोट लवकर भरते.    मखान्याच्या सेवनाने अनिद्रा, अस्वस्थ वाटणे, दूर होते. मखान्यात पोटँशिअम भरपूर मात्रेत असल्याने रक्तप्रवाह नियंत्रित राहतो. उच्च रक्तदाबावर अंकुश राहतो. यात सोडिअम अत्यल्प प्रमाणांत असते. मखाना ग्लूटेन, मुक्त आहे, व प्रोटिन युक्त आहे. ग्लायसेनिल इंडेक्स अतिशय कमी असल्याने याचे सेवन मधुमेह रुग