पोस्ट्स

होळी

इमेज
  सण होळी पौर्णिमेचा उत्साहाचा आनंदाचा करु पूजन होळीचे पुरणाच्या नैवेद्याचा करू काष्ठांचे ज्वलन सवे वाईट विचार जळो घातक कोरोना येवो आनंद बहार सण अग्नीच्या पूजेचा सण मनाच्या तेजाचा होवो उजळ वाटाही -हास नैराश्य भावाचा नटे रंगी वसुंधरा सृष्टी येई बहरात राधाकृष्ण प्रेमिकांचे ऋतू येवो जीवनात जाळू वैरभाव सारे आज माहौल रंगीत  आज रंगाचेच वारे सारे भिजूया रंगात  अर्चना मुरूगकर🙏🌹 व्हाट्सअप वरुन आज गोकुळात रंग,खेळे ना हरी, राधिके तू ही बसून राहा तुझ्या घरी... जो चटोर,मूर्ख कोण,मास्क टाळतो, येता जाता साबणाने हात ना धुतो, कोरोनाच्या साथीचा बळीच तो होतो, वाचशील राधिके ग काय तू तरी? राधिके तू ही बसून राहा तुझ्या घरी... आज श्याम सुंदरास काय जाहले, रंग टाकणेच त्याने का हो सोडले? गर्दीमध्ये जाणे त्या हरीने टाळले, कोरोनास रोखण्याची वाट ही खरी... राधिके तू ही बसून राहा तुझ्या घरी... त्या तिथे नकोच आज रंग खेळणे, ऐकूया जरा तया हरीचे सांगणे, रंग खेळणे न हो, जीवाशी खेळणे, वाचवूया जीव आज राहुनी घरी... राधिके तू ही बसून राहा तुझ्या घरी... *काॅपीपेस्ट करून पाठवलेलं सुरेख विडंबन*

प्रभातभक्ती

इमेज
  तिमिरातूनी तेजाकडे बाप्पा तेजकिरणांचे अज्ञानातून ज्ञानाकडे रुप विशाल ज्ञानचक्षूंचे तृतीय नेत्र उघडलेले ज्ञानकेंद्र सुवर्णसूर्याचे लावला बुक्का वैष्णवगंध बीजेचे दर्शन तुकोबाचे अभंग तरले इंद्रायणी जसे शुद्धज्ञान सवंग जीवनी क्षमाशील संतसूर्य तळपले अज्ञानगुह्य समाजजीवनी झडो कलंक आम्हा मतीचे बाप्पा भक्तीची तेज आभा संतकाव्य सदा तळपतसे अक्षर अभंग जशी सूर्यप्रभा अर्चना मुरूगकर🙏🌹 निळाई व्यापली सर्वत्र पितरंग उजळे रवीचा वक्रतुण्ड वरदहस्तात बाप्पा दिसे अंतरीचा रंग रंगी रंगले बाप्पा पसरला सर्वत्र भक्ती रंग  होऊ दे वर्षाव रंगांचा सारे आज रंगांत दंग अर्चना मुरूगकर🙏🌹 अंगणी गोमय सडा प्रात:काळी प्रसन्न   रेखले ठिपके ओळीने प्रगटले चतुर्भुज गजानन रंग भरले आवडीचे मळवट लाल भाळी हळदीने माखले अंग गुलाबी हस्त पुष्पकळी अलंकार सुवर्णाचे धारदार परशू हाती हिरेजडीत मुकूट शेंदूरमंडित मुखावरती हरित पितांबर कटीस जरीकाठ शोभे पिवळा जानवे रुळे अंगावर शैवगंध रेखले भाळा खाद्य कळीदार मोदक शोभे लंबोदर हातात आखलेल्या रांगोळीसम सप्तरंग फुलू दे जीवनात अर्चना मुरूगकर🙏🌹

गणेश भक्ती काव्यभक्ती

इमेज
 

सरळ माणसा

इमेज
  हरिभगिनी 8/8/8/6 फटका सरळ माणसा सरळ माणसा लोकशाहीत घरात भिऊन बसू नको झगमगणाऱ्या दुनियेमध्ये उगाच मागे लपू नको तुझीच ताकद उमजू देरे नव्यानेही तुला जरा चमचमणाऱ्या ताऱ्यांमध्ये अवस चंद्रमा बनू नको अंतर पहा तू स्वतः स्वतःचे इतरांवर तू  रुसू नको लपलेल्या त्या ज्वालामुखीस कोंडून आत बसू नको कतृत्वाच्या कार्या तुझ्या मिरवायाला भिऊ नको धगधग सारी विझूवून आत प्रेतासम तू जगू नको खांद्यावरती सहज पेलसी ओझ्याचे ते भार सदा अभिमानाने मिरव स्वतःला हीनत्वाने जगू नको दागिण्यासम जबाबदारी अंगी शोभे नित तुझ्या फळ कष्टाचे चाखत जगशी कशापुढेही झुकू नको गण तंत्राचा आधारच तू डळमळीत मग बनू नको तुझ्या हाती सत्ता सारी वेडा बनूण फिरू नको कळपामधील मेंढी बनूण अंधभक्त तू बनू नको  वापरकर्त्या नेत्यापुढती झुकून खाली दबू नको पारध्याला देती शिकवण पक्ष्यांना त्या स्मरू जरा एकीने या जगी जगता सत्ताधाऱ्या भिऊ नको पाझर फोडी पत्थरासही भगीरथाला आठव तू मतदानाचा हक्क बजावत राजा होण्या भिऊ नको अर्चना मुरूगकर,  तळेगाव दाभाडे

पुन्हा एकदा

इमेज
  पुन्हा एकदा वाटते भेटावे सारे बंध हळूच सोडावे खांद्यावरती डोके ठेवून भळभळणारे मन वाहू द्यावे न सांगता भाव माझे अचूक तुला सारे कळावे ऊन स्पर्शाने अश्रूंच्या अंतर सारे क्षणात मिटावे अश्रू तुझे पुसता मग आव आणूनी ज्ञान द्यावे सारे कळता वैद्य होऊनी स्वतःच स्वतःला औषध द्यावे मिठीत तुझ्या हळूच विरावे घट्ट मिठीत जग विसरावे आधाराचा हिमालय होऊन सारे दु:ख क्षणात टिपावे नसते जग मग आज जसे हे थोडे नक्कीच वेगळे असते  हात हातात नाहीत आता भकास पडिक स्वप्न उरते अनुभूतीच्या तरल भावात अंतर सारे भरून जावे प्रेमरूपी विशाल दर्यातले  अबोल मोती अलगद घ्यावे अर्चना मुरूगकर 🌹

असेही एक व्ह्यॅक्सीन यावे

इमेज
  विस्मृतीचेही व्ह्यॅक्सीन यावे की मी तुला पूर्ण विसरावे नकोच तो एक लपलेला कप्पा मुक्त होऊन एकटे जगावे नकोच पुन्हा ते हृदय पिळवटणे विरही अतृप्त भाव सोसणे वर्तमान नसलेल्या चित्रगुंत्याला मिटवावे जादूच्या खोडरबरने पुन्हा नव्याने सुख दु:ख नको ते हेलकावणाऱ्या भाव दोलकांचे मुक्त व्हावे साऱ्या बंधनातून व्हावे राजे आपापल्या मनांचे  विसरून जावे जग आपले ते नसावे कसलेच ताणतणाव हलके होऊन मोरपिसासम तरंगावे स्वानंदी मानस भाव अपेक्षाभंगाचे दु:ख नसावे  रेषांचे कुंपणच न दिसावे  पुन्हा जखडणाऱ्या स्वप्नसाखळ्यात अभिलाषांचे तोरण न दिसावे नकोत पुन्हा प्रश्न नवनवे  नकोत उत्तरे मन दुखावणारी हळवी फुंकर वर येणारी ओढ नवी जवळ आणणारी नकोच जबाबदारी नात्यांची पुन्हा सुप्रभात म्हणण्याची त्यानंतर नव्या प्रतिक्षांची मने सांभाळत जपण्याची हळूच पहावे अंतर उकलून प्रेमाच्या कक्षा विस्तारून हित जपावे पहात दुरून घ्यावे आनंदमोती प्रेमसागरातून अर्चना मुरूगकर🌹

चिवचिव चिमणी

इमेज
  चिवचिव चिमणी दारात येते चिवचिवाटाने आनंद देते पळवून लावते सारा थकवा  किणकिण आनंदी मन बनते कोमल रूप तिचे इवलेसे कार्य करी स्वच्छतादूताचे स्थान विशाल सृष्टीत असे प्राणीरूपी वैविध्याचे झाडे पाने  तिच्या हक्काचे जसे घरकुल तुझे सुखाचे  कापून झाडे नका करू बेघर हरवेल तिचे घर बापडीचे 'कोणाही जीवाचा न घडो मत्सर' हे तत्व सदा जप मनाशी मुक्या जीवांचे कर रक्षण नको बनूस मनुजा आधाशी नको बनवूस उजाड धरा जप मंत्र पुनरुज्जीवनाचे नांदतील सारे जीव सुखाने गोकुळ हसेल हिरव्या धरेचे गोळा होतील चिमण्या साऱ्या पुन्हा चिवचिवाट होई खिडकीत जाणून महत्व कर रक्षण माणसा बुद्धिमान तूच साऱ्या सृष्टीत.  अर्चना मुरूगकर🙏🌹 ं