पोस्ट्स

अष्टाक्षरी

इमेज
  अष्टाक्षरी उपक्रम विषय-मनी चांदणे हसावे येई मृगाचा पाऊस सृष्टी भिजली वर्षाने तन मन सुगंधित नाचे मोर आनंदाने कन्या नांदते सासरी साही कठोर बोलणे भेट माऊलीची होता गाली स्मिताचे चांदणे बाळ रडते आकांती उरी घेऊनी पाजावे तृप्त नजर पाहून मनी चांदणे हसावे जीव विरही जळतो मन लागेना कशात तिच्या पुसट भासाने खुशी मावेना उरात वृध्द माता ताटकळे आस मुलाच्या भेटीची त्याला पाहूनी पुढ्यात हर सुरकुती हसे सदा कष्टाचा डोंगर जसे चटके उन्हाचे त्याच्या धीराच्या साथीने दिस छायेत राणीचे बाळ पाळणाघरात आई येई परतूनी तिची चाहूल लागता बाळ जाई आनंदूनी मनी लाख स्वप्नदिवे बाप कर्जात बुडाला मिळे सहाय्य शिक्षणा हर्ष होई बालकाला सैनिकाच्या कुटुंबाच्या नसे आनंदाला थारा खूप दिसांनी पहाता हसू आसू वाहे झरा सज्जनांच्या मनामध्ये सदा भाव कल्याणाचे होई आनंदी अंतर सुख पाहूनी जगाचे अर्चना मुरूगकर🙏🌹

बालानंद मात्रावृत्त कविता

इमेज
 बालानंद मात्रा ८+६ लाट कोरोनाची भयाण शांती आज उरे दुकान घरही बंद पडे कोरोना च्या लाटेने बाजारपेठ ओस पडे हल्ल्याने या जंतूच्या सारेच पितळ उघड पडे साव बनूणी चोर फिरे व्यवस्थांचे धिंडवडे मानव सारा फिका पडे सुक्ष्मजीव हा चढा ठरे अनुकूलन या शक्तीने रूप बदलून पुन्हा उरे समाजशक्ती ढासळली राजसत्ता कोसळली   झाले बंदी माणसेच कोरोनाने खचलेली भय काळाचे जाणावे उगा बाहेर न पडावे संक्रमणाच्या शृंखलेस तोडत इथेच गाडावे अर्चना मुरूगकर🌹

आले भरून आभाळ

इमेज
  छंदरचना उपक्रम-१कविता-१ अष्टाक्षरी आले आभाळ भरुन बाप राबे शेतामध्ये करी रोज मशागत काटेकुटे उचलूनी करी रान लोण्यागत आत बाहेर उन्हाळा मन सोडते उसासे वर नजर आभाळी दृष्टी चातकाची भासे आले आभाळ भरुन मन हरखून जाई कुठं बघू कुठं न्हाई जीव हलकासा होई भोवताल अंधारला येई झुळूक वाऱ्याची फुटे सुखद फुलोरा गत नाचऱ्या मोराची फुटे आशेला पालवी लगबग चाले रानी स्वप्ने डोळ्यात हिरवी माय बनतसे राणी.  सौ. अर्चना रमेश मुरुगकर

गणेश

इमेज
 

भातुकली

इमेज
  भातुकली बालपणीची भातुकली आजही वाटते छान भांडी होती पिटुकली  नव्हते कसले ताण साग्रसंगीत बने स्वैपाक पोळी -भाजी, भात-वरण भरभरुन आग्रह करताना सोप्पे होते बनवणे पूरण क्षणात बने मी बाबा तर क्षणात बने आई नव्हता बडगा नोकरीचा तोरा मिरवण्याची असे घाई सोप्पे होते डॉक्टर बनणे नर्स होण्यात नव्हता कमीपणा शिक्षक बनूण शिक्षा करणे हाच असे शिक्षकी बाणा रुसून परत जाता येई सोडून खेळ अर्ध्यावर जमत नाही मुळीच आता  चक्रव्यूहात अडकल्यावर मिळेल ती नोकरी बरी जीवन फूलपंखी संपले आता खळ्यावरचे बैल बनलो कर्तव्य पार पाडता पाडता अर्चना मुरूगकर🙏 🌹

कोरोना

इमेज
 हरलोय आज आपण विसरलास तू आज नक्की कधी रहात होतास जंगलात संघर्षाचे रोजचे जीवन उद्याची होती तुला भ्रांत साधने काय कामाची जगणेच आज संपले तर रात्र संपून येते सकाळ वाग जरा धरुन धीर जिंकलाय तो करोना हरलोय आज आपण पुन्हा एकदा लाॅकडाऊनचे करावे लागते नियोजन  पाहून थोडा हलगर्जीपणा काढले त्याने डोके वर जगता येणार नाही मानवा पुन्हा जीवनच संपल्यावर आज अडकलोय आपण महामारीच्या मध्यावर गरीब-श्रीमंत, चोर-साव सारेच समान करोनासमोर भार वाहतोस डोक्यावर आधार संसाराला तुझा डोकेच उरले नाही तर मिळणार नाही घरच्यांना दूजा शत्रूची पाहून रीत सारी ठरवावा आपला गनिमी कावा नमवून त्यास साऱ्या मार्गे यशस्वीपणा पुन्हा गावा.  अर्चना मुरूगकर🙏 🌹 हरलोय आज आपण जंगलामध्ये होतास माणसा प्राण्यासारखा प्राणीच तू संघर्षाचे होते जीवन अन्न रोज शोधायचास तू साधने काय कामाची जगणेच आज संपले तर रात्र संपून येते सकाळ वाग जरा धरुन धीर जिंकलाय तो करोना हरलोय आज आपण पुन्हा एकदा लाॅकडाऊनचे करावे लागते नियोजन  पाहून थोडा हलगर्जीपणा काढले त्याने डोके वर जगता येणार नाही मानवा पुन्हा जीवनच संपल्यावर आज अडकलोय आपण महामारीच्या मध्यावर गरीब-श्रीमंत,

होळी

इमेज
  सण होळी पौर्णिमेचा उत्साहाचा आनंदाचा करु पूजन होळीचे पुरणाच्या नैवेद्याचा करू काष्ठांचे ज्वलन सवे वाईट विचार जळो घातक कोरोना येवो आनंद बहार सण अग्नीच्या पूजेचा सण मनाच्या तेजाचा होवो उजळ वाटाही -हास नैराश्य भावाचा नटे रंगी वसुंधरा सृष्टी येई बहरात राधाकृष्ण प्रेमिकांचे ऋतू येवो जीवनात जाळू वैरभाव सारे आज माहौल रंगीत  आज रंगाचेच वारे सारे भिजूया रंगात  अर्चना मुरूगकर🙏🌹 व्हाट्सअप वरुन आज गोकुळात रंग,खेळे ना हरी, राधिके तू ही बसून राहा तुझ्या घरी... जो चटोर,मूर्ख कोण,मास्क टाळतो, येता जाता साबणाने हात ना धुतो, कोरोनाच्या साथीचा बळीच तो होतो, वाचशील राधिके ग काय तू तरी? राधिके तू ही बसून राहा तुझ्या घरी... आज श्याम सुंदरास काय जाहले, रंग टाकणेच त्याने का हो सोडले? गर्दीमध्ये जाणे त्या हरीने टाळले, कोरोनास रोखण्याची वाट ही खरी... राधिके तू ही बसून राहा तुझ्या घरी... त्या तिथे नकोच आज रंग खेळणे, ऐकूया जरा तया हरीचे सांगणे, रंग खेळणे न हो, जीवाशी खेळणे, वाचवूया जीव आज राहुनी घरी... राधिके तू ही बसून राहा तुझ्या घरी... *काॅपीपेस्ट करून पाठवलेलं सुरेख विडंबन*