पोस्ट्स

अलक

  *२५/५/२२* *अलक लेखन* *विषय: वाढदिवस* घरात वाढदिवस म्हणजे धामधूम असायची. ताईचा वाढदिवस असला की तिचे अगदी कौतुक असायचे. भाऊच्या वाढदिसालाही मित्र, मैत्रिणी,  ग्रीटींग्स, हट्ट पुरवणे, सारे व्हायचे    बाबा गेले, पुजेसाठी फोटो बनवताना, त्यावर जन्म, मृत्यूच्या तारखा टाकल्या जात होत्या. अचानक लक्षात आले की सगळ्यांचे सारे करताना त्यांचा वाढदिवस मात्र कधी साजरा झालाच नव्हता.  सौ. अर्चना मुरूगकर त. दा.

रसग्रहण ०६/०५/२२

 🤗 _*हझल क्रमांक - २*_ 🤗 *चहूकडे चांडाळ-चौकड्या*  *कशास घालू मधे तंगड्या*  चांडाळचौकडी ही नको त्या गप्पा करण्यासाठी जमलेली असते. त्यांच्या या भानगडींची फलनिष्पत्ती ही निरर्थक असणार आहे. अजून हा गुंता वाढविण्यासाठी मी कशाला सामील होऊ?  रिकाम्या चांडाळचौकड्यांमधील असेच लोक सर्वत्र दिसत आहेत. मी  तंंगड्या घालणे, विनाकारण सामील होणे तमाशा (😁)घडवून आणण्या सारखेच आहे.  *कुठला कंपू, कुठला अड्डा!*  *उगाच उठवू नका वावड्या*  दुसऱ्यांकडे बघून विनाकारण मत बनवणे घाई करण्यासारखे आहे. फक्त ही तुमची भीती असू शकते!  हे अस्तित्वातच नाही ना!  *कशास देता कान भिंतिला*  *खिडक्या माझ्या सताड उघड्या*  माझ्याबद्द्ल बातम्या काढायचा प्रयत्न करू नका. मी सगळे माझे जीवन उघडे, सगळ्याला कळेल असे ठेवले आहे. एवढेपण कष्ट घेऊ नका हो!  *अख्खे जग हे फिदा तुझ्यावर!*  *किती कल्पना तुझ्या भाबड्या*  माणसाला आपण लोकांना फार आवडतो, ते मागे लागले आहेत, असे वाटते.  हे! हे! किती भोळेपणा आहे हा! कोणी तुझ्या मागे लागले नाही.  *टिपूस नाही डोळ्यांमध्ये*  *गप्पा सा-या इथे कोरड्या*  कित्ती आव आणता हो तुम्हाला दु:ख झाले आहे याचा. डोळ्य

राम

इमेज
  राम मनातील जागा होतो मनुष्य साधा कश्चित् किंचित चुकतो शिकतो नवीन घडतो विवेक संयम पाळत जाता राम मनातील जागा होतो दुर्मती रावण वाढत आहे जागोजागी आडवा येतो संस्कारांची जाणिव होता राम मनातील जागा होतो कुंभकर्ण निद्रिस्त कधीचा शासक येथे झोपी जातो सत्य नितीचा विजय पाहुनी राम मनातील जागा होतो वाटा येथे खारीचाही बीभीषणही साथी होतो धेय्य एक जर सत्शील सुंदर राम मनातील जागा होतो दुष्टांचे निर्दालन करण्या आदर्शांची स्वप्ने बघतो भजता भजता रामाला मग राम मनातील जागा होतो सौ. अर्चना मुरूगकर

रसग्रहण

 *_🌈गझल नक्षत्र  🌈_*  *गझल क्रमांक ०१*   *मनाचा मनाला जिथे ठाव नाही* *नकाशात माझ्या तुझे गाव नाही* गझलकार म्हणतात की, आपली मनेच जुळत नाहीत तेव्हा मी तुझ्याबद्दल विचारच करणार नाही. माझ्या नकाशात तुझे गावच नाही.  *नको मंथनाचे तुझे चंद्र मजला* *तुझ्या अमृताची मला हाव नाही* समुद्रमंथनातून चौदा रत्ने जी मूल्यवान रत्ने निघाली त्यांच्यात चंद्रमा ही आहे. गझलकार म्हणतात की असे खूप मूल्यवान असलेले, मंथनातून निघालेले पण तुझे असलेले चंद्रही नको आहेत.  अमृत प्राशनाने देव अमर झाले होते. पृथ्वीवर त्याची ज्याला त्याला हाव आहे. पण नाकारलेल्या नात्यातून येणारे काहीही नको आहे. असे येथे म्हटले आहे.  *जगा सांगते वेस फोडून टाहो* *इथे चोर सारे कुणी साव नाही* वेस, गावाचे प्रवेशद्वार. गावात प्रवेश करण्यापूर्वी ती स्वागत करत असते. पण वेस आता गावात येणाराला सावध करत आहे. इथे राहणारे चोर आहेत. तुम्हाला लुबाडतील.कोणीही सावंत उरले नाही. आश्रयाला येऊ नका.  *नसे गंध याला फुलांचा जराही* *मला वाटते हा तिचा घाव नाही* जरी प्रिय व्यक्तीने दिलेले घाव वेदनादायी असतात त्यासोबत काही हळव्या आठवणीपण असतात. म्हणून गझलकार म्हणत

रसग्रहण

 *गझल क्रमांक - १*   _*पादाकुलक*_   *आठवणींचा झोका तुटला*  *स्वप्नांचाही मेळा उठला*  आठवणी या प्रेयसीच्या संबंधित, भूतकाळातील, बालपणाशी संबंधित  अशा असतात. जेव्हा हा अधांतरी असणारा, आनंद दुःखाच्या हिंदोळ्यावरचा झोका तुटला तर  त्याच्याशी संबंधित स्वप्नही तुटतात. धुळीला मिळतात.  *पैसे देता नाते सुदृढ*  *नकार देता म्हणती कुठला*  बऱ्याच वेळा नातीगोती देण्याघेण्यावर अवलंबून असतात. गुळाभोवती मुंगळे. अशा माणसाची त्याची श्रीमंती पाहून हांजी हांजी करतात. संबंध आशेने टिकवून ठेवतात.  याउलट जो पैसे देऊ शकत नाही त्याला कोणी विचारत नाही.  *वडील मरता हिस्से वाटप*  *भाऊ-भाऊ भरती खटला*  एक घर, कुटुंब जे होते, सगळ्यांचे भाऊ म्हणून प्रेम ते वडील गेल्यानंतर  स्वार्थामुळे आणि मला कमी मिळेल या शंकेने वैऱ्याप्रमाणे नाते होते.  *स्वप्ने मुलांचे पूर्ण कराया*  *बाप उपाशी रोजच झटला*  मुलांचे शिक्षण, अनेक सुखसोयी, आरामदायी जीवन यासाठी वडील त्याग करत असतात. प्रसंगी उपाशी राहून स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाठिंबा  देत असतो.  *लग्न मुलीचे यंदा व्हावे*  *बेत बळीचा चुकून फसला*  शेतकऱ्याची अवस्था नेहमी त्रस्त. कधी ओला, कधी

गणेश

गझलेचे रसग्रहण

*वाचले ना चाळले त्यांनी मला बघ कसे चुरगाळले त्यांनी मला* वर्चस्व सिद्ध करण्याची घाई असली की बरेचदा प्रस्थापित लोक इतरांना बदनाम करतात. पूर्वग्रहदूषितपणाही  असू शकतो.  वाचणे.. सखोलपणे जाणणे चाळणे.. वरवर पहाणे हे काही न करता म्हणजेच जाणून न घेता हेटाळणी केल्याचे, त्यांना हवा तोच वापर करून घेतल्याचे शल्य यातून दिसते.  चूरगाळणे.. नाकारणे, फेकून देणे *खोल पुरले तर पुन्हा उगवेन मी* *याचसाठी जाळले त्यांनी मला* माझे विचार, व्यक्तीमत्व नकोआहेत. त्याची भिती आहे. मी पुन्हा उभारी घेऊ नये यासाठी मला कायमचे नष्ट केले.  * आजही केली सुखांची याचना* *आजही फेटाळले त्यांनी मला* स्रिया, समाजात अनेक कारणांमुळे दुय्यम स्थान असणाऱ्या साऱ्यांना कायद्याने समान न्याय दिला आहे.  या काळातही हक्कांची जाणीव करून दिली की नकोसे असते. सुखाची याचना करावी लागते.  होईल तेवढा अपमान करून माझी मागणीच फेटाळून लागली. की शक्यताच उत्पन्न होऊ नये.  * बोकडासम कापतांना समजले* *आजवर का पाळले त्यांनी मला* उपेक्षितांचे जीणे दुय्यमतेचे. कधी लाड  झालेच तर समजून घ्यावे, काही तरी फायद्यासाठी होत आहेत.  * मी दगड केले स्वतःला शेवटी* *मग कुठ