पोस्ट्स

अन् आली दीपावली...

इमेज
  अन् आली दीपावली... लोका नाही काम धाम, बसे घरी खाली पिली. करोनाचे संक्रमण,  अन् आली दीपावली. कर्ज शेतकरी डोई, राही मन खाली खाली.  आनंदाची असे खाई,  अन् आली दीपावली.   वारा वादळ पाऊस ,  शेतं पाण्याने भरली.  रडतोय शेतकरी,  अन्  आली दीपावली.  शाळा कॉलेज हो बंद,  हातो हाती मोबाईल.  डोके बधीर हा छन्द,  अन् आली दीपावली.  देवा केली तूच होळी,  विठू चिंतित माऊली.  दीपमाळ पेटवाहो ,  अन् आली दीपावली.  --रमेश मुरुगकर   

आॅनलाईन दिवाळी

इमेज
 लवकरच दिवाळी येणार पोस्ट्स चा पाऊस  होणार गॅलरी खच्च भरून जाणार दिवाळी आॅनलाईन होणार. रंगीत दिवे ,रांगोळ्या, जीफस् गाणी, लेख, माहिती सुंदर सगळ्या भाषेतील पोस्टस् चा भडिमार होतो दिवस चार.  आपणही सरसावतो पुढे चिकटवतो पोस्टस् चार नवे चम-चम लक्ष्मी, लाडू चिवडा फोटो-व्हिडिओ सारे देखावे.  कार्ड,  दिवाळीअंक झाले जुने   आॅनलाईन फराळाने तृप्त पाहुणे बिझनेस प्रमोशन, पार्ट्या, मैफिली आॅनलाईन बनली कोरोनाने.  दुरून का होईना भेटतील सारे मित्र, आजी-नातवंडे भरती मेळे आभासी जगाने वातावरण निर्मिले माणसाचे सर्वांशी धागे जोडले.          सौ. अर्चना मुरूगकर

माॅर्निंग वाॅक (कविता)

इमेज
सभोवती धुक्याची चादर तप्त लोहगोल डोंगरावर स्तिमित होऊनी क्षणभर सहजची जुळती दोन्ही कर पक्षी करती प्रसन्न किलबिल जागे होती सकल चराचर शाश्वत उर्जा पुरवी दिनकर न्हाऊन निघती वृक्षतरूवर.  मनुष्यप्राणी गुंग प्रपंची भ्रमण करी कधी निसर्गाची अनंतव्यापे जरी जगण्याची आरोग्य उर्जा देई निसर्गची.  प्रभातसमयीची ही चक्कर प्रसन्न पुलकित ठेवी दिनभर.  तनामनास मिळे बळकटी नमिता हा सर्वशक्ती भास्कर.            अर्चना मुरूगकर.              

रंगारंग दुनिया (कविता)

इमेज
  जाता रंगात रंगूनी मन जातसे गुंगूनी रंगारंग दुनियेत मन जाई हरखूनी.  येती प्रकाश किरण सात रंगात बसून,  जाणतात नेत्र दोन सृष्टी सौंदर्य पाहून. रंग निळा आकाशाचा पित  उत्साही उर्जेचा रंग तांबडा प्रेमाचा असे हरित सृष्टीचा.  खरा निसर्ग रंगारी नाना ऋतू नाना छटा रंग दावे दिनभरी मनोहारी रंगछटा.  कधी सुख कधी दु:ख रंग दावती भावना साऱ्या भावांचे महत्व असे मनुष्य जीवना.

🖋️लेखणी बोलते तेव्हा..

इमेज
  🖋️लेखणी बोलते तेव्हा..     लेखणीची किंमत काय आहे यावरून तिला महत्त्व येत नाही तर काय लिहिले यावरून लेखणीचे स्थान ठरते.लेखणी खरे तर लिहिण्याचे साधन!पण जेव्हा ही लेखणी बोलते तेव्हा ती मुक्तपणे विचार व्यक्त करते.समाजमन ढवळून काढते.समाजात अमुलाग्र बदल घडवून आणते.यासाठी परीक्षेसाठी लिहिणे आणि पाठांतर केलेलेच लिहिणे ही सवय बंद व्हायला हवी.लहाणपणापासूनच स्वत:चे विचार मांडता आले पाहिजेत.तरच प्रामाणिक विचार मांडण्याची सवय लागेल.          स्वातंत्र्यपूर्व काळातील वर्तमान पत्राचे महत्व व कार्य आपणा सर्वांना माहितच आहे. यामुळे येथील लोकांना पाश्‍चिमात्य जगाचे जगाची ओळख झाली .आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्यामुळे लोक विचार करायला शिकले.'दीनबंधु' वृत्त पत्राने बहुजन समाजाच्या चळवळीत महत्त्वपूर्ण कार्य केले. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात 'केसरी' व 'मराठा' या वृत्तपत्रांची भूमिका महत्त्वाची ठरली लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी जनतेच्या मनात ब्रिटिश सरकारविरुद्ध असंतोष निर्माण करण्याचे कार्य केले. यावरून आपल्याला कळते की लेखणी जेव्हा बोलते तेव्हा जनजागृत...

गोजिरी दिवाळी

इमेज
  गोजिरी दिवाळी  दीपमाला यक्षरात्री  सण मोठा सुखरात्री नवी पिके आली घरी  आनंदित शेतकरी.  आई असे आॅफिसात बंद मिठाई खोक्यात.  तोच आनंद मनात मग्न जरी खरेदीत.  पिके नासधूस झाली डोळयातल्या पाण्यासंगे स्वप्ने जरी लया गेली सण रांधते माऊली.  कोरोनाच्या संकटात मन, समाज आजारी दिवा लावी  कष्टकरी स्वप्ने उद्याची चंदेरी.  नका करू नासधूस द्यावे दान गरिबास लावू ज्ञानदीप घरी हिच दिवाळी गोजिरी. अर्चना  मुरूगकर

आॅफिसमधील दिवाळी (कविता)

इमेज
   दिपावली दिवे मांडले ओळीत खास रंग रांगोळीत जसा मंदिरी भाविक हर्ष,पावित्र्य मनात.  भेट प्रेमाची देऊन जशी माहेरा मैत्रीण.  देती मंगलकामना हर्षभरे आलिंगन.  लाडू फराळ चिवडा मित्रां संगती भोजन जसे सुदामा श्रीकृष्ण होई मोदाचे गुणन.  भरजरी परिधान शोभा येतसे सणाची गाठीभेटी सोहळ्यात जाण सुंदर नात्यांची.  काम करू एकोप्याने  दिवा पेटवू दिव्याने  असे महत्ता दानात हास्य फुलवी कुटीत.  -अर्चना मुरूगकर