पोस्ट्स

अलगद

इमेज
  अलगद बाळ दुडूदुडू येई वेगाने पहात मातेकडे आशेने हात पसरूनी उभी माता अलगद उचलून घेई मायेने दुखावणारे मन कळे प्रेयसीचे हळूच फुंकर घाली प्रेमाने घेतसे आरोप सारे स्वतःवर अलगद टिपतसे अश्रू काळजीने फुलला मोगरा पानोपानी लगडली वेल पुष्पभाराने हळूवार वेचूनी भारावे सुगंधाने अलगद घेई ओंजळीत कौतुकाने फुलपाखरू उडते फुलाफुलांवर पाहून त्याला मन होई आनंदी नाजूक रंगित फुलासम काया अलगद टिपतसे मधुपर्क निवडूनी मन झाकोळते जेव्हा काळजीने संकटे घेरतात सर्व बाजूंनी चक्रव्यूहासम भासे जग अबोध कोडे अलगद येई कुणी देवदूत होऊनी अर्चना मुरूगकर🌹

क्षुधा (मुक्तछंद कविता)

इमेज
 नविन आशा मनाची कधी लोकांना भेटण्याची नवीन कपडे, पुस्तके जत्रेमधल्या लहान मुलाची भूक असे मीलनाची अन्नाची अन् पाण्याची न संपणारी कधीही साांगता समाधानाची मन असे केंद्र क्षुधेचे अनेक आशा लालसांचे मन असे लगाम विवेकाचे न बनू देण्या वखवखीचे हव्यास क्षुधेचा तामसी बनवी रावण जगात  मर्यादा देई देवत्व  मानवा पुरूषोत्तम जगात

कविता कवितेची

इमेज
  कवितेचीही कविता असते शब्दालंकारे सुंदर नटते मिटून ठेवलेल्या ओठांमधले भाव सारे सहजच उलगडते कधी विद्रोही धगधगती जसे कोळसे आहारावरती श्रीकृष्णाच्या बासरीचे सुरेल सूर गिती गवसती  कधी नावरे हुंदके आतील माय वासरू जसे भेटती कधी मोदाची ये ललकारी सर्वांगी वसंत सृष्टी बहरती निसर्ग पाडी भुरळ मनाला जसा प्रियकर प्रेयसीला पाऊसवारा वीज कडकडे भयभीत भाव तिचा आतला शूरवीरांची गाथा सांगती पोवाडे भारदस्त समाजी जशी गर्जना मेघाची हो रोमांच अंगावर येती सहजी रडगाणे नी हास्यतराणे धबधबा रिक्त होणारा ओव्या अभंग ज्ञानाच्या लावणी दर्शवे हळूच शृंगारा.  अर्चना मुरूगकर🌹

अष्टाक्षरी कविता-वसंत ऋतू

इमेज
  अष्टाक्षरी कविता शिर्षक- वसंत ऋतू अविरत चाले चक्र  होती ऋतूंचे बदल नित्य नूतनच भासे सृष्टीमाता सभोताल करे वारा मनमानी गारठ्याला कंटाळून मंद सुगंध लेवूनी मोहरले आम्रवन राजा ऋतूंचा वसंत नव पल्लव भूवर नव्या आशेची पालवी फुले चराचरावर पित पुष्प बहरले तन-मन आनंदात मन तरुणाई नाचे सृष्टी सौंदर्य भरात कुहूकुहू थुईथुई चाले गायन नर्तन सळसळ किलबिल फुलतसे पानपान अर्चना मुरूगकर🌹

गणेश

इमेज
 

लेखणी

इमेज
  अष्टाक्षरी कविता लेखणी दिली लेखणी मजला पालकांनी आनंदाने स्वप्ने करण्या साजरी मिरवते ताकदीने तिचे जाणावे महत्व नको बेगडी लेखन घडो संवाद मनाचे उघडावे अंतर्मन घडे इतिहास काल परतंत्र राज्यामध्ये असे प्रखर अंजन लोकशाही राष्ट्रामध्ये व्हावी स्वतंत्र लेखणी नको गुलाम कुणाची असो आवाज बुलंद नको सत्तेची धनाची लेखनीने उमगली धरा साऱ्या संस्कृतीची कधी अन्याय कुनिती बोध वचने संतांची.  जसा सूर्यदेव जगी असे प्रज्वल प्रखर तशी विवेकी लेखणी तळपते धारदार.  अर्चना मुरूगकर🙏🌺

. मुलगी घरची

इमेज
  मुलगी घरची ती असते मुलगी घरची ती असते अल्लड वारा जी अवखळ झराच रानी जी श्वास घराचा सारा मी मिरवते तिचा तोरा जो मम छायेचा वावर ती बाळ लडिवाळ सदाच पथ प्रेमाचा तो भूवर नित नवीन वाटा तुडवी ध्वज किर्तीचा तो गगनी पथ प्रगतीचा वर नेई ती तर झाशीची राणी गुण  समन्वयाचा अंगी जी जपते सारी नाती ती सकल संस्कृती जाणे ती मातृत्वाची महती ती सोसत दु:खे पचवी गुण सदाच पेरत राही ती तेजस्वी तो तारा जो सदाच चमकत राही अर्चना मुरूगकर. मुलगी घरात असणे म्हणजे एक सजग जग आहे. ती काळाबरोबर घराला जोडते. सगळ्या फॅशन आईला शिकवते. भावाला वळण लावते. बाबांकडे ही लक्ष असते. आरोग्याबद्दल मायेने विचारणारी तिच. वाढीच्या काळात तर तिच्या रूपात चंचला घरात फिरत असते. सारे जुने नवे शिकत असते. घर कसे ठेवायचे, घरात नवीन काय घ्यायचे. अवखळ वाऱ्यासारखी घरभर फिरत असते. सगळ्यांची लाडकी. तिचा अल्लडपणा समजत असतो तरी आईबाबा कौतुकाने पहात असतात. साऱ्या जगाला गवसणी घालायला निघालेली असते. इतकी अवखळ की कुणीही बांधू शकत नाही. सगळ्या घरात ती खूप खूप लाडकी असते. तिच्यामुळे घराला नवी उर्जा मिळत असते. सकारात्मतकतेकडे, नव्या दिशेने घर प्रवास करते. ख