पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सण म्हणजे काय ❓

इमेज
सण म्हणजे काय❓ सण ठेवा संस्कृतीचा  जगण्याची रीत कळे समन्वय निसर्गाशी मानवाचा सणांमुळे शेतकरी आणि शेती असे निसर्ग  सांगाती  निसर्गाची करी पूजा कामा संगे बळीराजा.  बनू नका अंधश्रद्ध सणामागे असे शास्त्र संस्कृतीचे संवहन करा उघडे ठेवून नेत्र.  नका आणू कर्मठता जाणा सणाची महत्ता वनौषधी  पुष्पलता जगा देऊ सात्विकता.  नको नासाडी पैशाची अन्नौषधी नैवेद्याची मैत्री करा आप्तेष्टांची हिच महती सणांची.

चंद्र (कविता)

इमेज
  चंद्र🌜🌟 प्रतिक असे शीतलतेचे शीतस्त्रोत प्रकाशाचा  मस्तक शोभे शिवगणेशाचे  संदेश देई शांततेचा भासे कुणा वदन प्रेयसीचे   संपे काळ प्रतिक्षेचा खास नाते पृथ्वीचे त्याचे   चांदोमामा बालकांचा सौंदर्य खुले आकाशाचे   प्रियतम तारकांचा खेळ असे सावल्यांचा सखा पृथ्वीवासियांचा गूढ अस्तित्व लोभसतेचे लाडका कवींचा || .....अर्चना

माझ्या चारोळया

इमेज
   चार ओळी (four lines)मध्ये लिहल्या गेलेल्या कविता म्हणजे चारोळी.  चारोळी काव्याचा आकृतिबंध नावांतच सामावलाआहे.      चारोळी काव्यप्रकारात २ऱ्या व ४ थ्या ओळीत यमक साधल्या जाते,त्याचबरोबर काही वेळा सर्वच ओळीत यमक साधल्या जाते.    सहज तुलना केली तर,स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या चारोळी या पदार्थांशी नाव व गुणातही सार्धम्य साधल्या गेल्याचे दिसते.त्यामुळे चारोळी कविता म्हणजे अल्पाक्षरी, छोटा आकृतिबंध व त्याचबरोबर चारोळी या पदार्थासारखा पौष्टिक, गुणवर्धक व मनाला शांती देणारा असे म्हणण्याचा मोह होतो.      चारोळीत कवी एखादा प्रसंग,विषय मांडतात,सारांश सांगतात व ती पूर्ण कविता असते.मी इथे काही चित्र चारोळ्या पोस्ट करत आहे.  धन्यवाद

कोजागिरी

इमेज
  (चाराक्षरी काव्य)  पूर्ण चंद्र  गगनात कोजागिरी अश्विनात.  सृष्टी रूप,  स्थूल सूक्ष्मी.  वास करे,  आज लक्ष्मी.  गोळा होती,  मित्र सारे.  गप्पा गोष्टी,  न्यारे वारे.  पेढे-दुध प्रसादात,  पावभाजी ताटलीत.  प्रियकरा चंद्र भासे प्रियामुख.  मन हासे.  चम चम ,  आज चंद्र.  शुभ्र दुध,  शुभ्र चंद्र.  शरदाचे शुभ्र रौप्य,  मना सांगे सृष्टी गौप्य.  पाहू नका इतरत्र,  बना आज सृष्टी मित्र.  🙏🙏

हायकू

इमेज
 हायकू    'हायकू' महणजे तिन ओळीतील बंदिस्त लिखान. ती खूप ओळींची कविता नाही की अनेक प्रसंगांची कादंबरी.     'एक क्षण'.... त्यावेळचे चित्र आणि त्यामुळे कवीच्या मनात उमटलेल्या उर्मी. हायकू ही क्षणिका आहे.. अनुभवाच्या चरम अनुभवाची. हे हायकू 'चित्र हायकू' च्या स्वरूपात इथे पोस्ट करत आहे.  *काव्य म्हणजे काय?  *चहा हे फक्त पेय नाही तर अनेक गोष्टींचा साक्षीदार आहे. मित्र मैत्रिणीं सोबत घेतला तर जास्तच आनंददायी आहे.       *प्रभातसमयीचे दृश्य  सर्वांच्या मनाला भावते. सूर्याचा प्रकाश सगळीकडे पसरतो. कुठे सडा, रांगोळी तर कुठे पक्ष्यांची किलबिल. *'नंदादीप' ऐकूनच पावित्र्य जाणवते. मंदिरात, देवघरात शांत तेवत असतो. मनाला स्मरणाने ही आनंद देतो.  * बालपणात आकाशाला गवसणी घालण्याची स्वप्ने मनात असतात.  परंतु अभ्यास, टक्केवारी यांच्या दडपणाखाली स्वतंत्र जगण्याचे विचार नाहिसे होतात. पुढे ती उमेद हरवते.  *अनेक मुली स्त्रिया फेसबुकवरच्या प्रियकराच्या जाळ्यात फसलेले पाहतो. काही वेळा त्यांना आर्थिक त्रास झाल्याच्या बातम्याही वाचतो. तर...

देवीची नऊ रूपे

इमेज
       शारदीय नवरात्र  हा हिंदू धर्मातील एक उत्सव तसेच देवीशी संबंधित व्रत आहे. शारदीय म्हणण्याचे कारण इतकेच की हे शरद ऋतूच्या प्रारंभी येते. भारतामध्ये  सर्वत्र ह्या नवरात्रामध्ये प्रत्येकाच्या कुलाचाराप्रमाणे  पूजा-कृत्य घडते. आश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून , नंदादीप प्रज्वलित करून आदिमायेची नऊ दिवस मनोभावे पूजा करणे, म्हणजेच  घटस्थापना  किंवा नवरात्रोत्सव.    सर्व देवांच्या ठिकाणी असलेल्या शक्तींचे दैवतीकरण होऊन त्या शक्तरूप मूर्तीला देवी असे नाव मिळाले .       देवीची उग्र व सौम्य अशी दोन रूपे पहायला मिळतात. उमा, गौरी, पार्वती, जगदंबा , भवानी ही देवीच्या सौम्य रूपांची नावे असून  दुर्गा ,  काली , चंडी,  भैरवी ,  चामुंडा  ही देवीची उग्र रूपे आहेत. १. शैलपुत्री, २. ब्रह्मचारिणी ३. चन्द्रघंटा ४. कूष्मांडा किंवा (कुष्मांडी) ५. स्कंदमाता ६. कात्यायनी ७. कालरात्री ८. महागौरी ९.सिद्धिदात्री अशी ही देवीची नऊ रूपे आहेत.त्यांचे वर्णन संक्षिप्त रूपात कवितेमधून पाहूया.  (सर्व प्र...

नवरात्रीचे नवरंग

इमेज
       दरवर्षी नवरात्रीला नऊ वेगवेगळ्या रंगांचे महत्व असते. लोक ज्या त्या दिवशी त्या रंगाचे वस्त्र देखील परिधान करतात. मग नवरात्रीचे नऊ रंग कोणते ? आणि या रंगांचा काय फायदा होतो. खास करून नवरात्रात नऊदिवस नऊ वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र देखील देवीला परिधान केले जातात, अलंकाराने सजवले जाते.आपलं आयुष्य हे खूप रंगानी सजलेले आहे. त्यातील प्रत्येक रंगाचे वेगवेगळी वैशिष्ट्ये असतात . तर मग चला, या वर्षीचे नवरात्रीचे नऊ रंग आणि त्याची वैशिष्ट्ये वाचू या.  शनिवार: राखाडी रविवार: केशरी सोमवार: पांढरा मंगळवार: लाल बुधवार: निळा गुरूवार: पिवळा: शुक्रवार: हिरवा: पुढील दिवस मोरपंखी जांभळा 🙏🙏 सौ. अर्चना मुरूगकर 9762863231 तळेगाव दाभाडे, पुणे _मनमानसी