पोस्ट्स

ऐटीमध्ये रमू नको (फटका)

इमेज
  अधिकाराच्या मस्ती मध्ये मश्गुल बनून बसू नको भाटांमध्ये रमता रमता सत्य विसरून बसू नको खुर्चीसंगे अनेक चमचे त्यांच्यामध्ये रमू नको खुर्ची जाता पळती सारे खेदाने तू रडू नको शाली फेटे स्विकारताना काटे टाळत पळू नको कर्तव्याचा पंथ नितीचा  भिउनी मागे पडू नको आलस्याला गोंजारूनी लाड स्वत:चे करू नको काकबुद्धिने येताजाता टोचे मारत बसू नको कल्याणाचे बेगड लावी राजकारणी बनू नको खुर्चीपायी लांगुलचालन खोट्यासंगे फिरू नको करणाऱ्याच्या कामामध्ये खोडे घालत हसू नको कास धरण्या सत्याची मग लाजत मागे सरू नको माझे माझे मानत सारे लोभामध्ये बुडू नको हळूच निसटू जाता सारे नाराजीने रडू नको द्वेषभाव अन दुष्टाव्याने कामे सारी करू नको पेरशील जे उगवे सारे हेच विसरून फिरू नको व्यापकदृष्टी मनात नसता आव आणून जगू नको ढोंग दाखवत कौसल्येचे मंथरा मनी बनू नको झाकत साऱ्या चुका स्वत:च्या टिमकी मारत फिरू नको परनिंदेची कास धरूनी  ऐटीमध्ये रमू नको.  अर्चना मुरूगकर🌹 तळेगाव दाभाडे. 

आजच्या सावित्रीच्या अपेक्षा

इमेज
  शेणगोटे समाजाचे पराकाष्ठा साहण्याची शिक्षणाला योग्य साथ ज्योतीबांना सावित्रीची जन्म तुझा गौरवाचा आम्हा तुझ्या लेकींसाठी शिक्षणाचा दिला वसा सुधारणा साऱ्यांसाठी बांधू नका स्त्रीला आज वृथा रूढी  बंधनात अर्थ जीवना व्यापक स्वप्ने आणूया सत्यात खरा हक्क स्त्रीचा तिला देऊ समाज घरात नको सीमा शिक्षणाला समानता निर्णयात जरी शिक्षण मिळते मिळो सारे मान तिला नको निर्भया समाजी जगू द्यावे बालिकेला.  अर्चना मुरूगकर

कोंदण

इमेज
  कोंदण ऊब माहेरची माया शोभे लेक हिरा छान फुले लेकीचे जीवन त्यांच्या मायेचे कोंदण तुझे असीम सौंदर्य गाली हसू किणकिण रानझरा धून दूर शोभे लाजेचे कोंदण तुझे नाजूक शरीर खोप्यातील सुगरण कणखर बाणा तुझा स्वसंरक्षणाचे कोंदण तुझे त्याच्यावर प्रेम धाग्यातील घट्ट वीण बांधी मुक्त प्रेमा त्याच्या तुझ्या मनाचे कोंदण माय हळवी तुझ्यात सदा मुलाचे रक्षण तुझ्या नितीनियमाने त्याला शिस्तीचे कोंदण समाजाच्या रितीभाती त्याचे उमटे गोंदण जरी रुपाला बंधने साजे व्यक्तित्व कोंदण ऊब माहेरची माया फुले लेकीचे जीवन शोभे लेक हिरा त्यात त्यांच्या मायेचे कोंदण नव्या युगाचे कपडे नाही नऊवारी लेणं जपे विचार वारसा त्यात संस्कृती कोंदण अर्चना मुरूगकर🌹

कोरोना

इमेज
  कोरोना कोरोना आला परदेशातून फिरतो गल्ली बाजारातून पसरला सर्वत्र वेगाने गावागावातून कोरोना चालत नाही स्वत:च पळत नाही माध्यम पुरवतो तुम्ही आम्ही. कोरोना कळली आरोग्य स्वच्छता दाखवली आपलीच अस्वच्छता ब्रीद मानून पाळावी समाज स्वच्छता कोरोना ठरला बाधाच म्हाताऱ्या अशक्तांचा वैरीच थैमान मृत्यूचे जणु प्रलयच. कोरोना  परिणाम सर्वत्र गमावले रोजगार मात्र नव्या संधीसाठी भटकती इतरत्र कोरोना अभूतपूर्व दृश्य थांबले जग पुतळ्यासदृश्य झाली सारी गर्दी अदृश्य कोरोना थोड्याशा निष्काळजीने हाहाकार वाढे नव्याने जरी चुणूक दाखवली यमाने.  अर्चना मुरूगकर🌹 तळेगाव दाभाडे

अबोली

इमेज
   अबोली रंग हिचा अबोली भाषा असे अबोल सुंदर दिसे फूल नाजूक नी अबोल सदा असे गूपचिळी मनीचे भाव ना खोली मैत्रिणींच्या घोळक्यात कुजबुजते सानूली वेणीवर माळायला आवडते ललनांना मोगरा हिरवी पाने मिळून गुंफती त्यांना रंग असे वेगळा नसे सुगंध जरी खास शांत फुले वाहू देवास मनात स्थान असे खास

जाणता राजा

इमेज
  जाणता राजा आई शिवाई गर्जली जिजाईच्या वेदनेने पिंड पोसला बाळाचा अन्यायाच्या संतापाने केले पोषण धीराने गोष्टी सांगत वीरांच्या मित्र मावळे सोबती देव घडला न्यायाचा तळपली तलवार केले मुलूख काबिज केली किल्ल्यांची बांधणी जिंके शत्रू कावेबाज वीर योद्धा रणावर होते सोबती जीवाचे  केले स्थापन स्वराज्य स्थापी आदर्श युगांचे छत्रपती शिवा होता खरा रयतेचा राजा दिले स्त्रियांना अभय खऱ्या गुन्ह्याला सजा रात्रंदिन एक केले अंगी तेज भवानीचे   राज्य एका संन्याशाचे जगी जाणत्या राजाचे अर्चना मुरूगकर🌹

मराठी राजभाषा दिन

इमेज
  मराठी राजभाषादिन पडे कानावर माझ्या भाषा आईच्या तोंडून असे सोपे आकलन ज्यात प्रेमाचे शिंपण झालो ऐकत सुजाण श्लोक भारूडे किर्तन खेळ खेळता अंगणी होई सहज शिक्षण कधी बेगडी फुलात होई मन सुगंधित?  व्यक्त भावना होण्यास बोला मातीच्या भाषेत कळे सभ्यता संस्कृती   माझ्या मुलुखाची मला माझ्या मातीचे सोहळे  ज्ञान सारे देती मला पोसू पिंड ज्ञानरूपी मराठीच्या दुधावर तिचा भक्कम आधार जग पाहू दूरवर धन्य शिरवाडकर केली मराठी जतन अभिमान मनी धरू सण राजभाषा दिन अर्चना मुरूगकर🙏🌺