पोस्ट्स

*मकरसंक्रांत: धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन*

इमेज
 *रविवार लेख उपक्रम* दि.१५/१/२०२३ *मकरसंक्रांत: धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन* *मकरसंक्रांत: धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन*      आपले सगळेच सण उत्सव हे निसर्ग, शेतीप्रधान जीवनपद्धती, मौसमी फळे -भाज्या यांच्याशी निगडीत आहेत. पौष महिन्यात रथसप्तमीपर्यंत  होणारी आदित्य राणूबाईची पूजा, दर रविवारी केली जायची. त्याच्या कथा ऐकल्या जात असत.  त्यातून मिळणारा संदेश उतू नको मातू नको, घेतला वसा टाकू नको, साठा उत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण.. हे कानात घुमत असते. या रविवारची,रथसप्तमी ची पूजा, रांगोळीने चंदनाच्या पाटावर सूर्य, रथ रेखाटणे अशी होत असे. यातून प्रिंट मिडिया खूप प्रगत नसताना भौगोलिक ज्ञान,जीवन यांची सांगड  संस्कृतीच्या माध्यमातून  पुढच्या पिढ्यांकडे गेली.  बिब्याची फुले, करडईचे फुले यांना महत्व असायचे. बिब्याची फुले वातहारक आहेत. प्रत्येक देवतांच्या आवडत्या फुलांमध्ये काही वैशिष्ट्ये दडली आहेत. पिवळे, तपकिरी असे हे करडई फूल सूर्याच्या तेजस्वी पणाचे द्योतक आहे.  भोगविडे,संक्रांत, कर आणि महिनाभर चालणारे हळदीकुंकू असे उत्सवी बायकांच्या गोटातले वातावरण  संक्रांती निमित्ताने चालू असायचे. भोगी

गझल रसग्रहण (निखारा)

 निखारा """"'""""" *शांतपणे मी अवघड जगणे जगत राहिलो* *सुखस्वप्नांच्या भासावरती झुलत राहिलो* आजचे जगणे अवघड आहे तरी मी ते तक्रार न करता जगत आहे. त्या दु:खात असूनही सुखाचे भास मला होत राहिले. येणाऱ्या सुखाच्या आशेवर मी जगत राहिलो.  *अवती भवती जमले सारे सगेसोयरे* *स्वार्थ साधून निघून गेले कुढत राहिलो* सगेसोयरे फायद्यासाठी जवळ आले होते. त्यांचे काम झाले की निघून गेले आणि मी मात्र त्यांच्या आठवणीने आणि असा संधीसाधू पणा पाहून मनातच पुन्हा पुन्हा दु:ख करीत राहिलो.  *किती उन्हाळे जाळत गेले माहित नाही* *धोकादायक वळणावरती वळत राहिलो* नेहमी येणाऱ्या वंचनांमुळे गझलकाराचे मन दु:खी आहे. संकटामुळे होरपळले आहे. तरीही धोका पत्करुन, आव्हाने स्विकारुन जीवनात पुढे जाणे चालू आहे.  *जिकडे तिकडे रानभुलीच्या वाटा होत्या* *कुठे निवारा सापडतो का बघत राहिलो* जो मार्ग चोखाळावा तो भूल घालणारा फसवा निघत आहे. यामुळे जिवाला कोणताच दिलासा आधार राहिलेला नाही.  अशाही स्थितीत जिद्द न सोडता निवारा, आपल्या हक्काची विसाव्या ची जागा माणूस शोधत असतो.  *किती लांबचा प्रवास झाला क

गझलगंध

इमेज
  🔹 *गझल* 🔹 सुगंधाच्या  तराजूने फुलांना तोलतो आता* *हवा ही बोलकी झाली हवेशी बोलतो आता फुलांचा आकार, रूप न पाहता तुलना करताना गझलकार सुगंध ही बाब लक्षात घेणार आहेत. जो आपोआपच हवे सोबत येतो. जो  अदृश्य आहे, जाणवणारा आहे. अर्क आहे, बेधुंद करणारा आहे त्याची खरी ओळख दाखविणारा आहे. एक हळूवार कल्पना आहे.  माणसाची कार्यकिर्ती अशीच असते. त्याची ओळख असते. ती किर्ती हवे प्रमाणे पसरणारी असते. ही जाणून घेण्याचे प्रयत्न गझलकार करत आहेत.  * हा एकदा जेव्हा दिला आधार शब्दांनी* *बघा आकाश ताऱ्यांचे कसे मी तोलतो आता* शब्द शक्ती, शब्द ताकद, शब्द आधार आहेत. त्यामुळे कोणत्याही मोठ्या पदा शिवाय खूप मोठा अभिव्यक्तीचा अधिकार प्राप्त झाला आहे.  आकाश हे व्यापक, विशाल आहे. तारे या जणू विविध कल्पना आहेत. शब्दांमुळे कवी लीलया असा  हा भार पेलत आहे.  * जयांना स्पर्शण्या भीती सदा वाटेल डोळ्यांना* *अशा अस्पृश्य अश्रूंची तिजोरी खोलतो आता* जी अनेक दडवलेली दु:खे आहेत, ती सहजतेने कवी काव्याच्या माध्यमातून व्यक्त करू शकतात.  एकाचा उल्लेख करणे देखील दु:खदायक आहे. पण या माध्यमातून कवी अनेक दु:खे सहजतेने मांडू शकतो. तिजोरी म

अलक

  *२५/५/२२* *अलक लेखन* *विषय: वाढदिवस* घरात वाढदिवस म्हणजे धामधूम असायची. ताईचा वाढदिवस असला की तिचे अगदी कौतुक असायचे. भाऊच्या वाढदिसालाही मित्र, मैत्रिणी,  ग्रीटींग्स, हट्ट पुरवणे, सारे व्हायचे    बाबा गेले, पुजेसाठी फोटो बनवताना, त्यावर जन्म, मृत्यूच्या तारखा टाकल्या जात होत्या. अचानक लक्षात आले की सगळ्यांचे सारे करताना त्यांचा वाढदिवस मात्र कधी साजरा झालाच नव्हता.  सौ. अर्चना मुरूगकर त. दा.

रसग्रहण ०६/०५/२२

 🤗 _*हझल क्रमांक - २*_ 🤗 *चहूकडे चांडाळ-चौकड्या*  *कशास घालू मधे तंगड्या*  चांडाळचौकडी ही नको त्या गप्पा करण्यासाठी जमलेली असते. त्यांच्या या भानगडींची फलनिष्पत्ती ही निरर्थक असणार आहे. अजून हा गुंता वाढविण्यासाठी मी कशाला सामील होऊ?  रिकाम्या चांडाळचौकड्यांमधील असेच लोक सर्वत्र दिसत आहेत. मी  तंंगड्या घालणे, विनाकारण सामील होणे तमाशा (😁)घडवून आणण्या सारखेच आहे.  *कुठला कंपू, कुठला अड्डा!*  *उगाच उठवू नका वावड्या*  दुसऱ्यांकडे बघून विनाकारण मत बनवणे घाई करण्यासारखे आहे. फक्त ही तुमची भीती असू शकते!  हे अस्तित्वातच नाही ना!  *कशास देता कान भिंतिला*  *खिडक्या माझ्या सताड उघड्या*  माझ्याबद्द्ल बातम्या काढायचा प्रयत्न करू नका. मी सगळे माझे जीवन उघडे, सगळ्याला कळेल असे ठेवले आहे. एवढेपण कष्ट घेऊ नका हो!  *अख्खे जग हे फिदा तुझ्यावर!*  *किती कल्पना तुझ्या भाबड्या*  माणसाला आपण लोकांना फार आवडतो, ते मागे लागले आहेत, असे वाटते.  हे! हे! किती भोळेपणा आहे हा! कोणी तुझ्या मागे लागले नाही.  *टिपूस नाही डोळ्यांमध्ये*  *गप्पा सा-या इथे कोरड्या*  कित्ती आव आणता हो तुम्हाला दु:ख झाले आहे याचा. डोळ्य

राम

इमेज
  राम मनातील जागा होतो मनुष्य साधा कश्चित् किंचित चुकतो शिकतो नवीन घडतो विवेक संयम पाळत जाता राम मनातील जागा होतो दुर्मती रावण वाढत आहे जागोजागी आडवा येतो संस्कारांची जाणिव होता राम मनातील जागा होतो कुंभकर्ण निद्रिस्त कधीचा शासक येथे झोपी जातो सत्य नितीचा विजय पाहुनी राम मनातील जागा होतो वाटा येथे खारीचाही बीभीषणही साथी होतो धेय्य एक जर सत्शील सुंदर राम मनातील जागा होतो दुष्टांचे निर्दालन करण्या आदर्शांची स्वप्ने बघतो भजता भजता रामाला मग राम मनातील जागा होतो सौ. अर्चना मुरूगकर

रसग्रहण

 *_🌈गझल नक्षत्र  🌈_*  *गझल क्रमांक ०१*   *मनाचा मनाला जिथे ठाव नाही* *नकाशात माझ्या तुझे गाव नाही* गझलकार म्हणतात की, आपली मनेच जुळत नाहीत तेव्हा मी तुझ्याबद्दल विचारच करणार नाही. माझ्या नकाशात तुझे गावच नाही.  *नको मंथनाचे तुझे चंद्र मजला* *तुझ्या अमृताची मला हाव नाही* समुद्रमंथनातून चौदा रत्ने जी मूल्यवान रत्ने निघाली त्यांच्यात चंद्रमा ही आहे. गझलकार म्हणतात की असे खूप मूल्यवान असलेले, मंथनातून निघालेले पण तुझे असलेले चंद्रही नको आहेत.  अमृत प्राशनाने देव अमर झाले होते. पृथ्वीवर त्याची ज्याला त्याला हाव आहे. पण नाकारलेल्या नात्यातून येणारे काहीही नको आहे. असे येथे म्हटले आहे.  *जगा सांगते वेस फोडून टाहो* *इथे चोर सारे कुणी साव नाही* वेस, गावाचे प्रवेशद्वार. गावात प्रवेश करण्यापूर्वी ती स्वागत करत असते. पण वेस आता गावात येणाराला सावध करत आहे. इथे राहणारे चोर आहेत. तुम्हाला लुबाडतील.कोणीही सावंत उरले नाही. आश्रयाला येऊ नका.  *नसे गंध याला फुलांचा जराही* *मला वाटते हा तिचा घाव नाही* जरी प्रिय व्यक्तीने दिलेले घाव वेदनादायी असतात त्यासोबत काही हळव्या आठवणीपण असतात. म्हणून गझलकार म्हणत