पोस्ट्स

जून, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भूजंगप्रयात गझल

इमेज
  लगागा लगागा लगागा लगागा सुखा सोडुनी वंचना मागते मी उसासे चिकाटी जरा साहते मी झऱ्याची पहाडी उडी जाणते मी अशी ओढ आता खरी ठेवते मी विचारातल्या जाळती तप्त ज्वाळा फुलासारख्या ओवुनी माळते मी जगी पाहुनी वर्षणाऱ्या ऋतूला पृथेचे नवे रंगणे पाहते मी जगा वाटते ही फुकाची मुजोरी प्रतिष्ठेस माझ्या तरी राखते मी अर्चना मुरूगकर

सुखद शहारा (वंशमणी मात्रा वृत्त) ख

इमेज
  सुखद शहारा काळे काळे ढग आभाळी आले जलद जलाचे भरले ओले ओले मनास स्पर्शे थंडाव्याचा वारा आता वाटे दिवस हवेसे आले झोके घेती झाडे वेली  हलती गिरक्या घेती  सुकली पाने फिरती घूंघूं वारा  भीती  मनास आणे खिडकी मधुनी भित्रे डोळे बघती कडकड गडगड वीज चमकते वरती प्राणी पक्षी किलबिल गलका करती विस्मय सारा डोळ्यामध्ये दाटे भरून जाई जल नक्षीने धरती थेंब टपोरे वेगेवेगे  पडती एक आगळा सुवास पसरे माती ऋतुबदलाने सुखद शहारा येई आनंदाने सारे गाणे गाती.  अर्चना मुरूगकर

Gazalअननज्वाला मात्रावृत्त 8-8-8=24

इमेज
  अननज्वाला मात्रावृत्त 8-8-8=24 ऊर तडफडे आठवणीने चळल्यावरती किंमत समजे  समीप आता नसल्यावरती रोगराईत बंधन आले फिरण्यावरती भले वाटते जगात आहे कळल्यावरती मोल पाहुनी जमीन जुमला वाटे भारी किंमत मिळते घाम गाळुनी कसल्यावरती सगे सोयरे धावत येती पैश्यांसंगे रंग जगाचे कळती गरीब असल्यावरती जीवन वाटे नैराश्याने सदा रिकामे उमगत जाई आनंदाने हसल्यावरती अर्चना मुरूगकर

गझल - वृत्त-कालगंगा (गझल)

इमेज
 लगावली- गालगागा गालगागा गालगागा गालगा गझल - वृत्त-कालगंगा आसमंती गुंजणारा एक नारा पाहिजे कार्यकर्ते जोडणारा एक तारा पाहिजे वाळवंटी रापलेले आश्रयाला धावले अंतरीच्या दानतीचा नेक थारा पाहिजे पोळलेले नाडलेले सोसण्याने तापले सांत्वनाला धावणाऱ्या थंड गारा पाहिजे रक्त सारे गोठलेले अंध सारेच धावती तापताना पांगणारा आत पारा पाहिजे जीवनाला तोंडदेण्या कैक वाटा चालती सन्मतीने योग्य रस्ते ताडणारा पाहिजे.  अर्चना मुरूगकर

फटका

इमेज
 ४/५/२१     👍👍 हरिभगिनी फटका (८+८+८+६)  अविचाराचे ठसे नको मर्त्य माणसा प्राणी तूही टाळून हेच जगू नको उगाच साऱ्या जगतामध्ये तोरा मिरवत फिरू नको धडा शिकवला कोरोनाने विसरू जाई फसू नको सुख सोयीचे जीवन जगता राजा बनून बसू नको घेता घेता घेतच जासी देताना तू रडू नको झाडे प्राणी संपवतो तू जमिनीला ही भक्षू नको स्वर्ग घराचे बनवत जाता वसुंधरेला नडू नको प्रदूषणाच्या विषास पेरत तोंडावर तू पडू नको बुद्धिमान तू लोभाने मग हतबल पामर बनू नको उद्यास देण्या जतन करावे अविचाराचे ठसे नको.  अर्चना मुरूगकर

Gazal

इमेज
 वृत्त -मंजूघोषा लगावली- गालगागा गालगागा गालगागा भाकिताला शोधणारे पार झाले वर्तमानी  मोडणारे फार झाले योजनांना आखणारे खूप झाले कामगारा ठेचणारे वार झाले शोषितांच्या वेदनांचे घाव ओले दु:ख सारे पाहणारे गार झाले गारवा हा शांततेचा आज आला  शाप वाटे टोचणारे सार झाले वल्गनांचा पूर येथे दाट आहे सत्य सारे खंगणारे ठार झाले अर्चना मुरूगकर

Gazal

इमेज
  गझल वृत्त -आनंदकंद गागालगा लगागा गागालगा लगागा गर्वास टाक साऱ्या जाळून माणसा तू लीनत्व ठेव अंगी जोडून माणसा तू सत्तेस लाटतो तू सोडून लाज सारी मूल्यास बाणवावे शोधून माणसा तू लोकात बोलतो तू आदर्श तेच सारे सत्यात वाग तैसा शोधून माणसा तू पोटात पाप काळे ठेवून हिंडसी का घे माणसास साऱ्या सांधून माणसा तू माणूस माणसाशी होवून वाग आता मिथ्यातल्या मिजाशी सोडून माणसा तू अर्चना मुरूगकर

मेनका (गझल) गालगागा गालगागा गालगा

इमेज
 मेनका (गझल)  गालगागा गालगागा गालगा देशसारा झोपताना पाहिले सैनिकाला जागताना पाहिले शिक्षकांना पूजताना पाहतो ज्ञानपुष्पे वेचताना पाहिले मोठमोठ्या बक्षिसाचे सोहळे कष्टणारे राबताना पाहिले मातृशक्ती वंदनाला जाणतो त्यागमूर्ती वागताना पाहिले साधुरूपी वृक्षसारे मानतो सर्वकाही त्यागताना पाहिले अर्चना मुरुगकर