होळी
सण होळी पौर्णिमेचा उत्साहाचा आनंदाचा करु पूजन होळीचे पुरणाच्या नैवेद्याचा करू काष्ठांचे ज्वलन सवे वाईट विचार जळो घातक कोरोना येवो आनंद बहार सण अग्नीच्या पूजेचा सण मनाच्या तेजाचा होवो उजळ वाटाही -हास नैराश्य भावाचा नटे रंगी वसुंधरा सृष्टी येई बहरात राधाकृष्ण प्रेमिकांचे ऋतू येवो जीवनात जाळू वैरभाव सारे आज माहौल रंगीत आज रंगाचेच वारे सारे भिजूया रंगात अर्चना मुरूगकर🙏🌹 व्हाट्सअप वरुन आज गोकुळात रंग,खेळे ना हरी, राधिके तू ही बसून राहा तुझ्या घरी... जो चटोर,मूर्ख कोण,मास्क टाळतो, येता जाता साबणाने हात ना धुतो, कोरोनाच्या साथीचा बळीच तो होतो, वाचशील राधिके ग काय तू तरी? राधिके तू ही बसून राहा तुझ्या घरी... आज श्याम सुंदरास काय जाहले, रंग टाकणेच त्याने का हो सोडले? गर्दीमध्ये जाणे त्या हरीने टाळले, कोरोनास रोखण्याची वाट ही खरी... राधिके तू ही बसून राहा तुझ्या घरी... त्या तिथे नकोच आज रंग खेळणे, ऐकूया जरा तया हरीचे सांगणे, रंग खेळणे न हो, जीवाशी खेळणे, वाचवूया जीव आज राहुनी घरी... राधिके तू ही बसून राहा तुझ्या घरी... *काॅपीपेस्ट करून पाठवलेलं सुरेख विडंबन*