. मुलगी घरची
मुलगी घरची ती असते मुलगी घरची ती असते अल्लड वारा जी अवखळ झराच रानी जी श्वास घराचा सारा मी मिरवते तिचा तोरा जो मम छायेचा वावर ती बाळ लडिवाळ सदाच पथ प्रेमाचा तो भूवर नित नवीन वाटा तुडवी ध्वज किर्तीचा तो गगनी पथ प्रगतीचा वर नेई ती तर झाशीची राणी गुण समन्वयाचा अंगी जी जपते सारी नाती ती सकल संस्कृती जाणे ती मातृत्वाची महती ती सोसत दु:खे पचवी गुण सदाच पेरत राही ती तेजस्वी तो तारा जो सदाच चमकत राही अर्चना मुरूगकर. मुलगी घरात असणे म्हणजे एक सजग जग आहे. ती काळाबरोबर घराला जोडते. सगळ्या फॅशन आईला शिकवते. भावाला वळण लावते. बाबांकडे ही लक्ष असते. आरोग्याबद्दल मायेने विचारणारी तिच. वाढीच्या काळात तर तिच्या रूपात चंचला घरात फिरत असते. सारे जुने नवे शिकत असते. घर कसे ठेवायचे, घरात नवीन काय घ्यायचे. अवखळ वाऱ्यासारखी घरभर फिरत असते. सगळ्यांची लाडकी. तिचा अल्लडपणा समजत असतो तरी आईबाबा कौतुकाने पहात असतात. साऱ्या जगाला गवसणी घालायला निघालेली असते. इतकी अवखळ की कुणीही बांधू शकत नाही. सगळ्या घरात ती खूप खूप लाडकी असते. तिच्यामुळे घराला नवी उर्जा मिळत असते. सकारात्मतकतेकडे, नव्या दिशेने घर प्रवा...