पोस्ट्स

एप्रिल, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तुझ्यात देव दिसला

इमेज
 ८+८+४ वंशमणी मात्रा वृत्त तुझ्यात देव दिसला कोरोनाचे आहे आता दडपण पेटलेलेच दिसते आहे स्मशान लोकांसाठी कुठे जीवनच अर्पण वडिलच करती पोरासाठी तर्पण स्तब्धच आहे सारे आता शिक्षण कळले आता जीवनच खरे शिक्षण कंठाशी बघ आले सारे प्राणच श्रेष्ठत्व तुझे नाही आता मानच विश्वासाच्या भावाने रे जग तू सामर्थ्याचे सोने कर रे मग तू अहंपणाची झूल सोड तू आता पराधीनत्व मान स्वत:चे आता फक्त मानवा तुझ्यात देव दिसला गरजवंतास तोच कामी आला अर्चना मुरुगकर🙏🥀

इप्सित सारे त्याला मिळते

इमेज
 लवंगलता ८+८+८+४ इप्सित सारे त्याला मिळते रात्रीला जो घाबरला तो कधीच उठला नाही स्वप्न पाहतो जो दिवसाचे कधीच निजला नाही संघर्षाला टाळत जातो कधीच घडला नाही त्यानंतर ते पिकती मोती त्याला कळले नाही संकटसमयी खचला नाही धैर्याने जो लढतो दिस सोनेरी झळाळणारे तोच यशाचे बघतो घाव घणाचे सोसत जगण्या असे तयारी ज्याची यशस्वितेच्या माळेने मग होई तृप्तता त्याची मानवतेच्या कठीण मार्गे जो चालत जाई द्वेषाचे मग जहाल विष ते नच वाट्याला येई आत्मविश्वास ज्याच्या अंगी कष्टास घाबरत नाही दिन सौख्याचे तोच पाहतो यशात डुंबत राही मूल्य जपूनी सराव  करतो मैदानावर खेळत निखळ आनंद साफल्याचा राही त्यांच्या सोबत अभ्यास गिरवतो एकाग्रचित्ती निष्ठेने जो प्रार्थी इप्सित सारे त्याला मिळते टळे पसारा स्वार्थी अर्चना मुरुगकर🙏🥀

उदास वाटे रे

इमेज
  8+8+8+2) चंद्रकांता उदास वाटे रे पाहून तुला  दिवस लोटले मनास लागे रे आठवणींच्या चित्रफितीने  उदास वाटे रे राणी माझी उदास गल्ल्या उदास वाटा गं भक्तच नसता राऊळ सुने उदास वाटा गं चोरुन बघशी हळूच मजला माझी राधा गं नेत्र कटाक्षे फुलून येती साऱ्या बागा गं कृष्णसावळ्या अंत पहातो उगाच माझा तू?   दूराव्याने नकोस घेऊ प्राणच माझे तू?  सखेसाजणे पहा जराशी तुझ्यासंगे मी हृदयकंपने जपे उराशी श्वासासंगे मी अर्चना मुरुगकर

पादाकुलक (८+८) विदीर्ण मने

इमेज
 पादाकुलक (८+८)  विदीर्ण मने उगा आठवण तुझी पुन्हा रे उदास होई सांज सावळी आर्त वेदना चिरत जातसे भासांची मग बने साखळी कृष्णासंगे प्रेमापायी वेडी बनली ,राधाराणी गोकुळ प्रांती, वेशीवरती मागे ठेवी, सारी गाणी अनुभूतीच्या झोक्यावरती स्पर्श मनाचे मनास कळती अंतर बिंतर सारे खोटे क्षणात सारे भाव समजती प्रेम आपले, चिरतरुण हे गाई गाणी, सुखद क्षणांची फिकीर त्याला, नसे कधीही दुरावलेल्या, त्या जगतांची कुढण्याचेही दिवस संपले नवीन नाती नवे तराणे जीवनमार्गी फुले फुलोरा लपवत जावी, विदीर्ण मने.  अर्चना मुरूगकर 🙏🌹

चंद्रकांता मात्रा वृत्त 8+8+8+2 झोपच हरली गं

इमेज
  चंद्रकांता मात्रा वृत्त 8+8+8+2 झोपच हरली गं रूप  देखणे, मस्त चालणे ,सुंदर मुखडा  ,गं.  भूक हरपली, तहान हरपे,बघतो वेडा ,गं.  डौल तुझा रे, प्रिया साजणा,बघते वेडी , ही वेष भरजरी, ऐटच भारी, राजस मूर्ती, ही.  केस भुरभुरू, हसणे किणकिण,मला भेटली, तू जाता जाता, हळूच वळून, लाज लाजली, तू स्वप्न सख्या रे, नकळत माझे, हृदय चोरले ,तू भाव मुके ते, माझे अंतर, कसे वाचले, तू?  स्वप्न सुंदरी, पाहून तुला, झोपच हरली, गं रूपयौवना, तव प्रेमाने, स्वप्ने सजली, गं.  अर्चना मुरूगकर🌹

बालानंद

इमेज
 बालानंद वृत्त (८+६)  दिवस सारेच, मौजचे सोनपरीच्या ,वेशाचे अल्लड वय हे,वळणाचे प्रेमाची ही ,नसे उमज हसरे कप्पे ,जीवनाचे रंग मनाचे, मोहरले उरात गाणे, बावरले इंद्रधनूच्या, रंगांचे कैक धुमारे, फुटलेले निर्झर अवखळ, वेगाचा उत्साहाने ,शुभ्र हसे जल बिंदूंना,उडणाऱ्या अलगद पेरत, जात असे दिवस सारेच, मौजेचे प्रगतीच्या नव, आशेचे बंध तोडून, पळण्याचे फसवे मृगजळ, भासाचे अर्चना मुरूगकर🌹

कविता (पादाकुलक)

इमेज
  पादाकुलक ८+८ गरिबा घरचे स्वागत सुंदर लखलख भांडे, शीतल पाणी गरिबा घरचे, स्वागत सुंदर नाहीच जरी, अत्तरदाणी सुहास्य वदने, वचने मधूर आसनी नसे, चंदनी पाट ऊन घोंगडी,बाजेवरती कारभारीन,शंकर भोळा कर जोडूनी, स्वागत करिती मनापासून ,करिती आग्रह पानात जरी, कांदा भाकर आपुलकीच्या, गप्पागोष्टी संतोषाने,येई ढेकर शिष्टाचारी ,नच अवडंबर सुबोध वाणी , साधे विचार अहंपणाचा नाही वारा इथेच दिसती, खरे संस्कार अर्चना मुरूगकर🌹

अष्टाक्षरी

इमेज
  अष्टाक्षरी उपक्रम विषय-मनी चांदणे हसावे येई मृगाचा पाऊस सृष्टी भिजली वर्षाने तन मन सुगंधित नाचे मोर आनंदाने कन्या नांदते सासरी साही कठोर बोलणे भेट माऊलीची होता गाली स्मिताचे चांदणे बाळ रडते आकांती उरी घेऊनी पाजावे तृप्त नजर पाहून मनी चांदणे हसावे जीव विरही जळतो मन लागेना कशात तिच्या पुसट भासाने खुशी मावेना उरात वृध्द माता ताटकळे आस मुलाच्या भेटीची त्याला पाहूनी पुढ्यात हर सुरकुती हसे सदा कष्टाचा डोंगर जसे चटके उन्हाचे त्याच्या धीराच्या साथीने दिस छायेत राणीचे बाळ पाळणाघरात आई येई परतूनी तिची चाहूल लागता बाळ जाई आनंदूनी मनी लाख स्वप्नदिवे बाप कर्जात बुडाला मिळे सहाय्य शिक्षणा हर्ष होई बालकाला सैनिकाच्या कुटुंबाच्या नसे आनंदाला थारा खूप दिसांनी पहाता हसू आसू वाहे झरा सज्जनांच्या मनामध्ये सदा भाव कल्याणाचे होई आनंदी अंतर सुख पाहूनी जगाचे अर्चना मुरूगकर🙏🌹

बालानंद मात्रावृत्त कविता

इमेज
 बालानंद मात्रा ८+६ लाट कोरोनाची भयाण शांती आज उरे दुकान घरही बंद पडे कोरोना च्या लाटेने बाजारपेठ ओस पडे हल्ल्याने या जंतूच्या सारेच पितळ उघड पडे साव बनूणी चोर फिरे व्यवस्थांचे धिंडवडे मानव सारा फिका पडे सुक्ष्मजीव हा चढा ठरे अनुकूलन या शक्तीने रूप बदलून पुन्हा उरे समाजशक्ती ढासळली राजसत्ता कोसळली   झाले बंदी माणसेच कोरोनाने खचलेली भय काळाचे जाणावे उगा बाहेर न पडावे संक्रमणाच्या शृंखलेस तोडत इथेच गाडावे अर्चना मुरूगकर🌹

आले भरून आभाळ

इमेज
  छंदरचना उपक्रम-१कविता-१ अष्टाक्षरी आले आभाळ भरुन बाप राबे शेतामध्ये करी रोज मशागत काटेकुटे उचलूनी करी रान लोण्यागत आत बाहेर उन्हाळा मन सोडते उसासे वर नजर आभाळी दृष्टी चातकाची भासे आले आभाळ भरुन मन हरखून जाई कुठं बघू कुठं न्हाई जीव हलकासा होई भोवताल अंधारला येई झुळूक वाऱ्याची फुटे सुखद फुलोरा गत नाचऱ्या मोराची फुटे आशेला पालवी लगबग चाले रानी स्वप्ने डोळ्यात हिरवी माय बनतसे राणी.  सौ. अर्चना रमेश मुरुगकर

गणेश

इमेज
 

भातुकली

इमेज
  भातुकली बालपणीची भातुकली आजही वाटते छान भांडी होती पिटुकली  नव्हते कसले ताण साग्रसंगीत बने स्वैपाक पोळी -भाजी, भात-वरण भरभरुन आग्रह करताना सोप्पे होते बनवणे पूरण क्षणात बने मी बाबा तर क्षणात बने आई नव्हता बडगा नोकरीचा तोरा मिरवण्याची असे घाई सोप्पे होते डॉक्टर बनणे नर्स होण्यात नव्हता कमीपणा शिक्षक बनूण शिक्षा करणे हाच असे शिक्षकी बाणा रुसून परत जाता येई सोडून खेळ अर्ध्यावर जमत नाही मुळीच आता  चक्रव्यूहात अडकल्यावर मिळेल ती नोकरी बरी जीवन फूलपंखी संपले आता खळ्यावरचे बैल बनलो कर्तव्य पार पाडता पाडता अर्चना मुरूगकर🙏 🌹

कोरोना

इमेज
 हरलोय आज आपण विसरलास तू आज नक्की कधी रहात होतास जंगलात संघर्षाचे रोजचे जीवन उद्याची होती तुला भ्रांत साधने काय कामाची जगणेच आज संपले तर रात्र संपून येते सकाळ वाग जरा धरुन धीर जिंकलाय तो करोना हरलोय आज आपण पुन्हा एकदा लाॅकडाऊनचे करावे लागते नियोजन  पाहून थोडा हलगर्जीपणा काढले त्याने डोके वर जगता येणार नाही मानवा पुन्हा जीवनच संपल्यावर आज अडकलोय आपण महामारीच्या मध्यावर गरीब-श्रीमंत, चोर-साव सारेच समान करोनासमोर भार वाहतोस डोक्यावर आधार संसाराला तुझा डोकेच उरले नाही तर मिळणार नाही घरच्यांना दूजा शत्रूची पाहून रीत सारी ठरवावा आपला गनिमी कावा नमवून त्यास साऱ्या मार्गे यशस्वीपणा पुन्हा गावा.  अर्चना मुरूगकर🙏 🌹 हरलोय आज आपण जंगलामध्ये होतास माणसा प्राण्यासारखा प्राणीच तू संघर्षाचे होते जीवन अन्न रोज शोधायचास तू साधने काय कामाची जगणेच आज संपले तर रात्र संपून येते सकाळ वाग जरा धरुन धीर जिंकलाय तो करोना हरलोय आज आपण पुन्हा एकदा लाॅकडाऊनचे करावे लागते नियोजन  पाहून थोडा हलगर्जीपणा काढले त्याने डोके वर जगता येणार नाही मानवा पुन्हा जीवनच संपल्यावर आज अडकलोय आपण महामारीच्या मध्...